Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Fact Check : अफगाणिस्तानच्या मुस्लिम खेळाडूने महाशिवरात्रिच्या दिवशी शतक ठोकून वाजवला डमरू? जाणून घ्या Video चं सत्य

Fact Check : सध्या इंग्लंड विरुद्ध दमदार शतक ठोकलेला अफगाणिस्तानचा क्रिकेटर इब्राहिम जादारान याचा शतक सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला की इब्राहिमने महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) दिवशी शतक ठोकल्यावर डमरू वाजवण्याचा इशारा नमस्कार करत भगवान शिवची आठवण केली. 

Fact Check : अफगाणिस्तानच्या मुस्लिम खेळाडूने महाशिवरात्रिच्या दिवशी शतक ठोकून वाजवला डमरू? जाणून घ्या Video चं सत्य

Fact Check : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धा आता रोमांचक होऊ लागली आहे. तब्बल 8 वर्षानंतर आयोजित केलेल्या या स्पर्धेत दररोज एकापेक्षा एक अतितटीचे सामने हे खेळवले जात असून बुधवारी अफगाणिस्तानने इंग्लंडवर सर्वात मोठा विजय मिळवून इतिहास रचला. अफगाणिस्तानचा स्टार फलंदाज इब्राहिम जादारान याच्या 177 धावांच्या जीवावर अफगाणिस्तानने रोमांचक सामन्यात इंग्लंडचा 8 धावांनी पराभव केला. यामुळे इंग्लंड थेट चॅम्पियन्स ट्रॉफीतूनच बाहेर पडली. सध्या अफगाणिस्तानचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) सेमीफायनलच्या रेसमध्ये आहे. जर ते शुक्रवारी ऑस्ट्रेलियाला हरवण्यात यशस्वी झाले तर थेट सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. सध्या इंग्लंड विरुद्ध दमदार शतक ठोकलेला अफगाणिस्तानचा क्रिकेटर इब्राहिम जादारान याचा शतक सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला की इब्राहिमने महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) दिवशी शतक ठोकल्यावर डमरू वाजवण्याचा इशारा नमस्कार करत भगवान शिवची आठवण केली. 

इब्राहिम जादारान याने इंग्लंड विरुद्ध सामन्यात 146 बॉलमध्ये 177 धावा केल्या. याने या दरम्यान 12 चौकार आणि 6 षटकार लगावले. शतक पूर्ण केल्यावर जादरान याने लाईव्ह सामन्यात हेल्मेट काढला आणि दोन्ही हात जोडले. त्यानंतर त्याने अफगाणिस्तानच्या ड्रेसिंग रूमकडे पाहून हाताने काही ईशारा केला. अनेकांना तो इशारा डमरू वाजवल्या सारखा वाटला. त्यामुळे सोशल मीडियावर अफगाणिस्तानचा खेळाडू इब्राहिम जादारानने शतक ठोकल्यावर भगवान शिवची आठवण केली असं म्हटले जाऊ लागलं. परंतू हा दावा खोटा असल्याचं समोर आलं. इब्राहिम जादारान याने स्वतः सामना संपल्यावर त्याने केलेलं सेलिब्रेशन कोणासाठी होतं याचा खुलासा केला आहे.

हेही वाचा : Champions Trophy: 'तुम्हाला लाज वाटली पाहिजे', म्हणणाऱ्या योगराज सिंग यांना वसीम अक्रमने दिलं उत्तर, 'तुम्ही असला उद्धटपणा...'

 

व्हायरल व्हिडीओ : 


सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ : 

शुक्रवारी sanghparivarorg या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडीओमध्ये लिहिले होते की, अफगाणिस्तानचा स्टार फलंदाज इब्राहिम जादारान याने इंग्लंड विरुद्ध शतक ठोकल्यावर सेलिब्रेशन करताना डमरू वाजवण्याचा ईशारा केला आणि तो भगवान शिव समोर नतमस्तक झाला. या व्हिडीओवर लोक विविध प्रकारचे कमेंट करत होते. धीरज नावाच्या युजरने कमेंट करत पॉवर ऑफ सनातन अशी कमेंट केली. तर  एविक2077 याने अखंड भारत म्हणत प्रतिक्रिया दिली. 

काय आहे व्हिडीओचं सत्य?

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (icc)

इंग्लंड विरुद्ध दमदार खेळी करून शतक ठोकल्यावर इब्राहिम जादरान याने त्याने केलेल्या सेलिब्रेशनबाबत स्वतः खुलासा केला. तो म्हणाला शतक ठोकल्यावर केलेलं हे इब्राहिम जादरान अफगाणिस्तानचा खेळाडू राशिद खान याच्यासाठी होतं. जेव्हा जेव्हा सामन्यापूर्वी मी राशिद खानशी बोलतो तेव्हा त्या सामन्यात मी खूप मोठी इनिंग खेळतो. त्यामुळे जेव्हा मी माझं शतक पूर्ण केलं, तेव्हा मी राशिदला धन्यवाद दिले. इब्राहिम या उत्तराने व्हायरल व्हिडीओमध्ये केला जाणारा भगवान शिव आणि डमरूबाबतचा दावा हा खोटा आहे हे कळून येतं.  

Read More