Sachin Tendulkar And Shilpa Shirodkar : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही जुने व्हिडीओ आणि पोस्ट व्हायरल होतायत. ज्यात दावा करण्यात आलाय की 90 च्या दशकात दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आणि बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शिरोड़कर यांच्यात अफेअर होतं. पण आता असा प्रश्न उपस्थित होतो की गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) यांच्यात खरंच अफेअर होतं का? आणि इतक्या वर्षांनी या गोष्टीला हवा कुठून मिळाली?
मीडिया रिपोर्ट्स आणि प्रमाणिक सूत्रांनुसार सचिन तेंदुलकरचं नाव कधीही सार्वजनिकपणे शिल्पा शिरोडकरशी जोडलं गेलेलं नाही. दोघांचं अफेअर असल्याची बातमी ही गॉसिप आहे. रेड एफएमला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत शिल्पा शिरोड़करने याविषयी सांगितलं.
अभिनेत्री शिल्पा शिरोड़कर म्हणाली की, 'सचिन सोबत माझी भेट 1991 रोजी एका फिल्मच्या शुटिंगवेळी झाली होती. तेव्हा सचिन आपल्या भावासोबत बांद्रा ईस्टमध्ये क्रिकेट खेळायचे. जेव्हा माझी त्यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली तेव्हा सचिन आधीपासूनच अंजली सोबत रिलेशनशिपमध्ये होता. ही गोष्ट कोणालाच सांगण्यात आली नव्हतो. फक्त आम्हालाच याबद्दल माहित होतं. एक अभिनेत्री जेव्हा क्रिकेटरला भेटते, आणि ते सुद्धा सचिन तेंडुलकर सारख्या अभिनेत्याला तेव्हा त्यांच्याबाबत चर्चा सुरु होणं खूप सोपं आहे. पण तेव्हा आम्ही फक्त एकदाच भेटलो होतो.
हेही वाचा : IND VS ENG Test : टीम इंडियात अचानक एंट्री घेणारा अंशुल कंबोज कोण आहे? मुंबई इंडियन्स कनेक्शन माहितीये का?
सचिन तेंडुलकरने 1995 मध्ये अंजली तेंडुलकर सोबत विवाह केला होता अंजली एक डॉक्टर आहेत. सचिनला सुद्धा शिल्पा शिरोडकरबाबत विचारण्यात आलं होतं. तेव्हा यावर उत्तर देताना सचिन म्हणाला होता की, 'लोकं म्हणायचे की माझं आणि शिल्पा शिरोडकरचं अफेअर होतं पण आम्ही एकमेकांना नीट ओळखत सुद्धा नव्हतो.
शिल्पा शिरोडकरने 1990 च्या दशकात किशन कन्हैया, हम और आंखें सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. 2000 मध्ये तिने ब्रिटिश बँकर अपरेश राणे सोबत विवाह केला त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीशी अंतर राखलं.