Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

गोष्ट एका थप्पडची; श्रीसंत आणि भज्जीला एकत्र पाहून चाहत्यांना झाली आठवण!

श्रीसंतने त्याचा जुना साथीदार हरभजन सिंग सोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

गोष्ट एका थप्पडची; श्रीसंत आणि भज्जीला एकत्र पाहून चाहत्यांना झाली आठवण!

मुंबई : 2013 मध्ये आयपीएलमध्ये फिक्सिंग झाल्याचं समोर आलं होतं. यामध्ये राजस्थान रॉयल्सच्या काही खेळाडूंची नावं फिक्सिंगमध्ये घेण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण क्रिकेट जगतात खळबळ उडाली होती. या दरम्यान ज्या खेळाडूचं नाव सर्वात जास्त चर्चेत आलं ते म्हणजे. एस श्रीसंत. मात्र, श्रीसंतने आपली शिक्षा पूर्ण केली आहे आणि आता तो देशांतर्गत क्रिकेटच्या माध्यमातून भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करतोय.

दरम्यान, श्रीसंत सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसला आहे. तो त्याचे नवीन फोटो शेअर करत राहतो. तर आता त्याने त्याचा जुना साथीदार हरभजन सिंग सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोमुळे चाहत्यांना हरभजनने श्रीसंतला लगावलेल्या थप्पडची आठवण झाली आहे.

खरं तर, 2008 च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवणाऱ्या हरभजन सिंग किंग्ज इलेव्हन पंजाबचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतला कानशिलात लगावली होती. यानंतर संपूर्ण जगाने श्रीसंतला रडताना पाहिले. या घटनेनंतर दोघांमध्ये बरंच अंतर वाढलं होतं. परंतु आता ते दोघेही सर्व विसरून मित्र झाले आहेत.

fallbacks

अर्थात हे दोघंही पुन्हा मित्र झालेत पण चाहत्यांना पुन्हा एकदा यांच्यामध्ये झालेली थप्पडची गोष्ट आठवली. यामुळेच श्रीसंतच्या फेसबुक पोस्टवरील चाहते त्याला 2008 च्या थप्पडची आठवण करून देत आहेत. श्रीसंतच्या या पोस्टवर अनेकांनी त्याला खूप ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

Read More