Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Virat Kohli निवृत्त होणार? सोशल मीडियावरील 'त्या' ट्विटमुळे चर्चेला उधाण

बंगळूरूचा फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा फेल ठरलाय.

Virat Kohli निवृत्त होणार? सोशल मीडियावरील 'त्या' ट्विटमुळे चर्चेला उधाण

मुंबई : आयपीएल जिंकण्याचं रॉयल चॅलेंजर बंगळूरूचं यंदाचं स्वप्नही भंगलंय. आयपीएल 2022 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा राजस्थानने पराभव केला. यावेळी बंगळूरूचा फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा फेल ठरलाय. अवघे 7 रन्सवर तो प्रसिद्ध कृष्णाचा बळी ठरलाय. दरम्यान विराटच्या या अपयशानंतर चाहत्यांनी त्याला पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. 

कालच्या सामन्यात विराट फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला असता ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच ओव्हरमध्ये सिक्स मारून चाहत्यांना खूश केलं. मात्र पुढच्याच ओव्हरमध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या ओव्हरमध्ये त्याने पव्हेलियनचा रस्ता धरला. 

तर आता विराट कोहलीचा फॉर्म पाहता फॅन्स त्याच्यावर टीका करतायत. यावेळी विराटने आता निवृत्ती घ्यावी, असा सल्ला त्याला सोशल मीडियावर देण्यात आलाय.

यामध्ये एका युझरने, आयपीएलच्या यंदाच्या सिझनमधील विराट कोहली सर्वात वाईट खेळाडू ठरला असल्याचं म्हटलंय. तर दुसऱ्या एका युझरने त्याला, ट्रोल होण्यापेक्षा आता निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे. 

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील क्वालिफायर 2 सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवलाय. आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 158 रन्सचं आव्हान राजस्थानने 11 बॉलआधी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह राजस्थानने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. तर आरसीबीचं आयपीएल जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा अधुरं राहिलंय.

Read More