DC vs KKR, IPL 2025: आयपीएल 2025 (IPL) चा 48 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला. सामन्याच्या पहिल्या डावातील शेवटच्या षटकात खूपच उत्साह दिसून आला. शेवटच्या षटकात तीन चेंडूत तीन विकेट्स बघायला मिळाल्या. याशिवाय या षटकात असा एक कॅच दिसला ज्याला बघून हा खरा कॅच आहे की नाही यावर विश्वास ठेवणे कठीण होईल. दिल्लीचा वेगवान गोलंदाज दुष्मंथ चामीराने एक चमत्कारिक कॅच (Dushmantha Chameera Flying Catch) घेतला ज्यामुळे सर्वंच बघत बसले.
केकेआरच्या डावात मिचेल स्टार्कची शेवटची षटक फारच रोमांचक ठरली. या षटकात सलग तीन विकेट पडल्या. षटकाच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर तीन फलंदाज बाद झाले.
हे ही वाचा: "नालायक हो-निकम्मे हो..." पहलगाम हल्ल्यावर शाहिद आफ्रिदी जे बोलला ते ऐकून तुमचे रक्त खवळेल, बघा Viral Video
दुष्मंथा चमीरा त्याच्या उत्कृष्ट झेलने चर्चेत आला. त्याने बाउंड्रीवर धावताना एक जबरदस्त कॅच घेतला आहे. चमीराने हवेत उडी मारली आणि गरुडासारखी नजर चेंडूवर ठेवली आणि कॅच घेतला. हा कॅच घेताच मैदानात उपस्थित असलेला कर्णधार अक्षर पटेल आणि केएल राहुल देखील आश्चर्यचकित झाले. चमीराचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हे ही वाचा: IPL 2025: भर मैदानात विराट आणि कोहली केएल राहुल भिडले! वादावादीचा Video Viral
Is that Superman? No, it’s #DushmanthaChameera!
— Star Sports (@StarSportsIndia) April 29, 2025
Is this the best catch of the tournament so far?
Watch the LIVE action https://t.co/GeTHelSNLF#IPLonJioStar #DCvKKR | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar pic.twitter.com/2gl98tQN35
या सामन्यात दोन्ही संघांमध्ये रंगतदार सामना झाला. केकेआरने 204 धावांचा आकडा समोरच्या संघाला दिला. प्रत्युत्तरादाखल, फाफ डु प्लेसिसने शानदार अर्धशतक झळकावून संघाला चांगली सुरुवात करून दिली. अक्षर पटेलनेही आपल्या अष्टपैलू कामगिरीने सामन्यात जीवंतपणा आणला. पण शेवटच्या ६ षटकांमध्ये सुनील नरेनच्या गोलंदाजीने सामन्याचा निकाल बदलला.