Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आजपासून रंगणार फीफा वर्ल्डकप 2018 ची धूम

मोस्ट ब्युटीफुल गेम... अशीच फुटबॉलची ओळख....

आजपासून रंगणार फीफा वर्ल्डकप 2018 ची धूम

रशिया : मोस्ट ब्युटीफुल गेम... अशीच फुटबॉलची ओळख.... जगभरातील अव्वल फुटबॉलपटूंचा महामेळा रशियामध्ये भरणार आहे. जवळपास एक महिना चालणा-या फुटबॉल विश्वचषकामध्ये फुटबॉलप्रेमींचं केवळ निखळ मनोरंजनच या निमित्तानं होणार आहे...... 

फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे.. टीव्हीवर हा खेळ पाहणाऱ्यांची संख्याही सर्वाधिक आहे. प्रत्येक गोलला चीअर करणारे फुटबॉलप्रेमी आणि गोल करण्याची संधी हुकल्यामुळे अश्रू अनावर झालेले फुटबॉलप्रेमी फुटबॉलच्या मैदानावर दिसतात.... 

क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र याच फुटबॉलच्या मैदानावर बदलतंं..... कधी पारडं एका संघाकडे तर कधी दुसऱ्या संघाकडे.....  शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणारे सामने फुटबॉल चाहत्यांसाठी एक पर्वणीच असतात. जगभारातील सर्वोत्तम 32 संघांमध्ये फुटबॉल विश्वचषकाला गवसणी घालण्यासाठी घमासान रंगतं.  त्याचप्रमाणे दोन फुटबॉलपटूंमध्य़े  मैदानावर रंगणारं द्वंद्वही या निमित्तानं पाहण्याची संधी फुटबॉल चाहत्यांना मिळते. वेअर द स्टार अलाईन असं या  फुटबॉल  विश्वचषकाचं घोषवाक्य..... त्यामुळे आता पुढचा एक महिना सर्वत्र केवळ फुटबॉल आणि फुटबॉलचीच चर्चा रंगणार हे नक्की.... तर सज्ज व्हा या मोस्ट ब्युटीफूल गेमचा थरार अनुभवायला.....

Read More