Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

FIFA World Cup 2018 : विमानप्रवासादरम्यान आगीतून बचावली 'ही' फूटबॉल टीम

फीफा वर्ल्ड कपची धूम रशियामध्ये सुरू झाली आहे. 

FIFA World Cup 2018 : विमानप्रवासादरम्यान आगीतून बचावली 'ही' फूटबॉल टीम

रोस्तोव आन दोन: फीफा वर्ल्ड कपची धूम रशियामध्ये सुरू झाली आहे. सौदी अरेबियाचे खेळाडू त्यांच्या पुढच्या सामन्यासाठी विमानाने निघाले होते. अशातच झालेल्या एक अपघाताने खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

विमानात आग - 

रोस्तोव आन दोनकडे येणार्‍या विमानाच्या इंजिनामध्ये  अचानक आग लागली. मात्र विमान वेळीच सुरक्षितपणे उतरवण्यात आल्याने खेळाडू बचावले आहेत. 

सौदी फूटबॉल महासंघाचे अध्यक्ष अहमद अल हर्बी यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये या प्रसंगाची माहिती दिली आहे. " विमानाच्या इंजिनामध्ये लहान स्वरूपाची आग लागली होती. मात्र यावेळी प्रसंगावधान साधत विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आलं आहे. या प्रसंगाचा एक व्हिडिओदेखील ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.  

 

कसा होता प्रसंग ?

व्हिडिमध्ये एकाने या प्रसंगावर प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हांला भीती वाटली का ? असे विचारताच " नाही.. थोडी भीती वाटत होती पण अल्लाहचे धन्यवाद!" असे त्यांनी सांगितले आहे. 

Read More