Wayne Larkins Dies Aged 71: भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या दरम्यान एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. तब्बल 41820 धावा आणि 86 शतक झळकावणाऱ्या इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूचे निधन झाले आहे. या दिग्ग्ज क्रिकेटपटूचे नाव वेन लार्किन असे आहे. ते एक महान फलंदाज होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वेन लार्किन हे गेल्या काही काळापासून एका गंभीर आजाराशी झुंज देत होते. त्यांनी अखेर वयाच्या 71 वर्षी जगाचा निरोप घेतला. ‘नेड’ या टोपणनावाने ओळखले जाणारे लार्किन इंग्लंडसाठी 1979 ते 1991 दरम्यान खेळले. त्यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1953 रोजी युनायटेड किंगडममधील रॉक्सटन या लहानशा गावात झाला होता.
लार्किन यांनी इंग्लंडसाठी 13 कसोटी आणि 25 एकदिवसीय सामने खेळले. कसोटीत त्यांनी 25 डावांत 20.54 च्या सरासरीने 493 धावा केल्या. वनडेमध्ये त्यांनी 24 डावांत 24.62 च्या सरासरीने 591 धावा जमा केल्या. टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांनी तीन अर्धशतक होती, तर वनडेमध्ये त्यांनी एक शतक झळकावलं होतं.
इंग्लंडच्या नॉर्थम्पटनशायर, डरहम आणि बेडफोर्डशायर या संघांकडून त्यांनी अनेक वर्षे ओपनर म्हणून खेळ खेळला. त्यांनी 482 फर्स्ट क्लास आणि 485 लिस्ट ए सामने खेळले.
हे ही वाचा: Video: षटकार मारला काही क्षणातच...मैदानातच झाला क्रिकेटपटूचा मृत्यू, कारण...घटना कॅमेऱ्यात कैद
फर्स्ट क्लास क्रिकेट: 842 डाव, 34.44 सरासरी, 27142 धावा, 59 शतके, 116 अर्धशतके, सर्वोत्तम खेळी – 252 धावा
लिस्ट ए क्रिकेट: 467 डाव, 30.75 सरासरी, 13594 धावा, 26 शतके, 66 अर्धशतके, सर्वोत्तम खेळी – नाबाद 172 धावा
त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दत 1358 डावांमध्ये त्यांनी 41820 धावा, 86 शतके आणि 185 अर्धशतके अशी जबरदस्त कामगिरी त्यांनी केली होती.
Some sad news to bring you.
— Test Match Special (@bbctms) June 28, 2025
Former @NorthantsCCC, @DurhamCricket & @englandcricket opener Wayne Larkins has died.
He was 71.
Larkins played 13 Tests & 25 ODIs including being part of the 1979 World Cup runners up squad.
Thoughts with his family & friends. #bbccricket pic.twitter.com/vj3WG6OuYa
लार्किन यांच्या जाण्याने इंग्लंडच नव्हे तर संपूर्ण क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांनी खेळलेल्या प्रत्येक इनिंगमध्ये एक वेगळी ऊर्जा आणि स्टाईल होती. त्यांच्या आठवणी नेहमी क्रिकेट चाहत्यांच्या हृदयात जिवंत राहतील.