Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL च्या दरम्यान आली वाईट बातमी! भारताच्या 'या' माजी कर्णधाराचे निधन, क्रीडा जगताला धक्का

 Sportsman death news: आयपीएल 2025 सुरु असताना दरम्यान एक वाईट बातमी आली आहे. क्रीडा विश्वासाठी ही एक धक्कादायक बातमी आहे.   

IPL च्या दरम्यान आली वाईट बातमी! भारताच्या 'या' माजी कर्णधाराचे निधन, क्रीडा जगताला धक्का

India Basketball: बुधवार 9 एप्रिल हा दिवस भारतीय क्रीडा जगतासाठी चांगला नव्हता. आयपीएल 2025 च्या दरम्यान एक वाईट बातमी आली आहे. यामुळे देशातील क्रीडाप्रेमींचे मन दुखावले आहे. दिग्गज बास्केटबॉल खेळाडू आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार हरी दत्त कापरी (hari dutt kapri death) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 83 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कापडीच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि दोन मुले आहेत.  यामुळे देशातील बास्केटबॉलप्रेमींचे दुःखात आहेत. 

भारताचा सर्वोत्तम कर्णधार

हरी दत्त कापडी हे त्यांच्या काळातील सर्वोत्तम कर्णधार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय बास्केटबॉल संघाने सातत्याने चांगली कामगिरी केली होती. ते कर्णधार असताना १९६९ मध्ये भारतीय बास्केटबॉल संघ आशियामध्ये सातव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचला. १९६५ ते १९७८ पर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय बास्केटबॉल संघाने सातत्याने चांगली कामगिरी केली होती.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिग्गज बास्केटबॉल खेळाडू आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार हरी दत्त कापरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, " उत्तराखंडचा अभिमान आणि भारतीय बास्केटबॉलला नवीन उंचीवर नेणारे अर्जुन पुरस्कार विजेते श्री हरी दत्त कापरी जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. खेळाप्रती असलेल्या त्याच्या समर्पणाने आणि भक्तीने तो केवळ एक उत्तम खेळाडूच नाही तर असंख्य तरुणांसाठी प्रेरणास्थानही बनला. मी देवाकडे प्रार्थना करतो की त्यांनी त्यांच्या पुण्यवान आत्म्याला त्यांच्या चरणी स्थान द्यावे आणि शोकाकुल कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी."विनम्र श्रद्धांजली.''

मूळ गाव कोणते? 

१० एप्रिल, गुरुवारी रामेश्वर घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कापरी यांचा जन्म 1942 मध्ये पिथौरागढ जिल्ह्यातील मुवानी भागातील चिरियाखान गावात झाला होता.  

अर्जुन पुरस्काराने सन्मानित

१९६९ मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कापरी यांना उत्तराखंड सरकारने जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित केले.

 

 

Read More