Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

वैभव सूर्यवंशीवर इतके कशाला खर्च केले? RR प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर फलंदाज संतापला; 'तुम्ही गोलंदाजांना...'

IPL 2025: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पराभव केल्यानंतर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ प्लेऑफमधून बाहेर पडला आहे.   

वैभव सूर्यवंशीवर इतके कशाला खर्च केले? RR प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर फलंदाज संतापला; 'तुम्ही गोलंदाजांना...'

IPL 2025: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पराभव केल्यानंतर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ प्लेऑफमधून बाहेर पडला आहे. यानंतर माजी भारतीय फलंदाज अभिनव मुकुंदने (Abhinav Mukund) राजस्थान रॉयल्स संघाच्या व्यवस्थापनावर टीका केली असून, लिलावात योग्य रणनिती न आखल्याने संघ टॉप 4 मधून बाहेर पडला असल्याचं म्हटलं आहे. चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघातून खेळलेल्या मुकुंदने राजस्थानच्या व्यवस्थापनाने फलंदाजांवर प्रमाणापेक्षा जास्त पैसे खर्च केल्याची टीका केली आहे. यामध्ये त्याने वैभव सूर्यवंशीचाही उल्लेख केला आहे. राजस्थानने आपल्या गोलंदाजांच्या फळीकडे फारसं लक्ष दिलं नसल्यानेच ते लवकर बाहेर पडल्याचं मत त्याने मांडलं आहे. 

"त्यांनी फक्त एकाच गोलंदाजावर जास्त पैसे खर्च केले आहेत तो म्हणजे आर्चर. दुर्दैवाने त्यांनी भारतीय खेळाडूंची योग्य निवड केली नाही. तुषार देशपांडे ज्याला या सामन्यात बेंचवर बसवण्यात आलं त्याला खूप पैसा खर्च करुन (6.75 कोटी) विकत घेण्यात आलं. याशिवायही त्यांनी नितीश राणा, वैभव सूर्यवंशी या भारतीय खेळाडूंवर जास्त पैसे खर्च केले," असं मुकुंदने ESPNcricinfo शी संवाद साधताना म्हटलं.

राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी त्यांची सर्वात दुबळी बाजू म्हणजे त्यांची गोलंदाजी आहे. याआधी त्यांच्याकडे आवेश खान, युझवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्ट सारखे गोलंदाज आहेत. "मी कितीही विचार केला तरी, वैभव सूर्यवंशीला 1.1 कोटी आणि नितीश राणाला 4.2 कोटीत विकत घेतलं नसतं. मी काही चांगल्या गोलंदाजांवर पैसे खर्च केले असते. तुम्ही गेल्या हंगामातील गोलंदाजी पाहा. मोठी नावं विसरुन जा. तुमच्याकडे अद्यापही आवेश खान, चहल, अश्विन संदीप शर्मा आणि बोल्ट असे गोलंदाज आहेत," असं तो म्हणाला. 

मुंबईविरोधातील सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 100 धावांनी पराभव झाला. मुंबईने सलग सहावा सामना जिंकत गुणतालिकेत पहिला क्रमांक गाठला आहे. 

Read More