Former Indian Cricketer Died: भारतीय क्रिकेट विश्वासाठी एक वाईट बातमी आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि डावखुरे स्पिनर (spinner) दिलीप दोषी यांचे लंडनमध्ये निधन (Dilip Doshi Passes Away In London) झाले आहे. सोमवारी, 23 जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या अनेक दशकांपासून लंडनमध्ये स्थायिक होते. त्यांच्या निधनाचे कारण हृदयविकाराचा तीव्र झटका असल्याचे सांगितले जात आहे. या बातमीमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. बीसीसीआयनेही याबद्दल सोशल मीडियावरून माहिती देत श्रद्धांजली दिली आहे.
दिलीप दोषी यांनी वयाच्या 32व्या वर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. केवळ चार वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांनी 100 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी क्रिकेटपासून अलिप्त राहणे पसंत केले. त्यांनी आपल्या कारकिर्दीवर 'स्पिन पंच' (Spin Punch) नावाचं आत्मचरित्रही लिहिलं आहे.
हे ही वाचा: Video: चेंडू डोळ्यासमोर पकडला, उजव्या-डाव्या बाजूला फिरवला... साई सुदर्शनने नेमकं काय केलं?
दोषी हे 1979 ते 1983 या काळात भारतीय संघाचे भाग होते. त्यांनी एकूण 33 टेस्ट सामने खेळून 114 विकेट घेतल्या होत्या. विशेष म्हणजे त्यांनी सहा वेळा एका डावात पाच बळींची कामगिरी केली होती.
हे ही वाचा: IND vs ENG: निर्णायक दिवसाच्या आधीच भारताला दिलासा, मिळाली गुड न्यूज; 'या' गोष्टीमुळे टीम इंडियाला होईल फायदा
दोषी यांनी भारतासाठी 15 वनडे सामने खेळले. त्यामध्ये त्यांनी 3.96 च्या इकोनॉमी रेटने गोलंदाजी करत 22 विकेट घेतल्या. त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सौराष्ट्र, बंगाल, बर्कशायर आणि नॉटिंघमशायर यांसाठीही खेळ केलं आहे.
हे ही वाचा: IND vs ENG: लीड्स कसोटीत पंतने केली मोठी चूक, रागाच्या भरात केली 'ही' कृती; ICC करणार कारवाई?
दिलीप दोषी यांच्या पश्चात त्यांची पत्नी कालिंदी, मुलगा नयन आणि मुलगी विशाखा असा परिवार आहे. त्यांचा मुलगा नयन दोषी हाही सौराष्ट्र आणि इंग्लंडमधील सरे (Surrey) संघाकडून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळला आहे. दोषी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबासह लंडनमध्ये राहत होते आणि तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.