मुंबई: फ्रेंच ओपन स्पर्धेतील अंतिम सामन्याचा निकाल नुकताच लागला आहे. युवा आणि झुंजार त्सित्सिपासला पराभूत करत नोव्हाक जोकोव्हिचनं इतिहार रचला आहे. राफेल नदालला सेमिफायनलमध्ये पराभूत करून फायनलमध्ये देखील जोकोव्हिचनंच बाजी मारली आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेचं विजेतेपद नोव्हाक जोकोव्हिचनं पटकावलं आणि १९वं ग्रँडस्लॅम पदावर आपलं नाव कोरलं.
ग्रीसचा २२ वर्षांचा युवा टेनिसपटू स्टेफानोस त्सित्सिपास आणि जगातील प्रथम क्रमांकाचा सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचमध्ये चुरशीची लढत झाली. हा अंतिम सामना अंगावर रोमांच उभा करणार होता. पाच सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात जोकोव्हिचने त्सित्सिपासला 6-7, 2-6, 6-3, 6-2, 6-4 हरवत फ्रेंच ओपनचं दुसऱ्यांदा जेतेपद पटकावलं.
Djokovic defeats Tsitsipas in five-set marathon, wins French Open for second time
— ANI Digital (@ani_digital) June 13, 2021
Read @ANI Story | https://t.co/Kz5ZDGTNx2 pic.twitter.com/gAAIP6Mgyd
Novak Djokovic rallies past Stefanos Tsitsipas, 6-7(6), 2-6, 6-3, 6-2, 6-4 to win his second Roland Garros title
— ANI (@ANI) June 13, 2021
(File pic) pic.twitter.com/hA4kjoKPaR
52 वर्षांत पहिल्यांदाच जोकोविचने सिंगल ग्रँडस्लॅम मिळवणारा खेळाडू ठरला आहे. लाल मातीवर आपली सत्ता गाजवत त्याने हा विक्रम रचला. सुरुवातीचे दोन सेट गमवल्यानंतर सामना हातातून निसटू नये यासाठी त्याने उर्वरित सेटमध्ये प्राण पणाला लावून प्रयत्न केले आणि त्याला अखेर यश मिळालं. एकट्यानं हा ग्रँडस्लॅम जिंकण्याची त्याची दुसरी वेळ आहे. त्याचं जगभरात कौतुक होत आहे.
तिसऱ्या सेटनंतर त्सित्सिपासला पाठीचं दुखणं सुरू झालं. मात्र त्याने मैदान सोडलं नाही. या युवा खेळाडूनं जिंकण्याची आशा अखेरपर्यंत सोडली नाही. तो प्रयत्न करत राहिला. चौथ्या सेटपासून जोकोविच त्याच्यावर भारी पडला. पहिल्या दोन सेटमध्ये विजय मिळवता आला मात्र शेवटपर्यंत हा विजय टिकवण्यात त्याला यश मिळालं नाही. मात्र या युवा खेळाडूचंही कौतुक होत आहे.