Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs AUS Semi-Final: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी दुबईची खेळपट्टी बदलली, भारताला होणार नुकसान?

India vs Australia Semi Final: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महाकाव्य लढाई काही तासांत सुरू होईल. टीम इंडिया दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने खेळत आहे, त्यावरून अनेक टीका झाली. पण आता मोठ्या सामन्याआधी खेळपट्टीच बदलली आहे.   

IND vs AUS Semi-Final: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी दुबईची खेळपट्टी बदलली, भारताला होणार नुकसान?

India vs Australia Semi Final, Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा हंगाम सुरु आहे. बघता बघता ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यावर आली आहे. आज 4 मार्च रोजी अ गटामधील पहिली उपांत्य फेरी रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महाकाव्य लढाई अवघ्या काही तासांत सुरू होणार आहे. टीम इंडिया सुरक्षेच्या कारणामुळे दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने खेळत आहे. यावरून भारतीय संघावर जोरदार टीकाही झाली आहे. अनेकांच्या मते एकाच खेळपट्टीवर खेळामुळे भारतीय संघाला फायदा होत आहे.  पण आता मोठ्या सामन्याआधी खेळपट्टी बदलली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य फेरीतील लढत नव्या खेळपट्टीवर होणार आहे.

टीम इंडियाला फायदा मिळाला?

भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी2025 मध्ये आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारताने पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा पराभव करत सलग तीन विजय मिळवले आहेत. मात्र दरम्यान, भारताला एकाच खेळपट्टीवर खेळण्याचा फायदा झाला अशी टीका झाली. सर्वात आधी पाकिस्तानने टीका केली. पाकिस्तानने भारताला एकाच खेळपट्टीवर सतत सराव आणि खेळण्याचा फायदा सांगितला. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजानेही भारताच्या विजयाचे श्रेय खेळपट्टीच्या फायद्याला दिले. मात्र या टीकेला आता उपांत्य फेरीत उत्तर मिळणार आहे. 

हे ही वाचा: IND vs AUS LIVE Score: आज रंगणार पहिली उपांत्य फेरी, भारताची होणार ऑस्ट्रेलियासोबत लढत

 

सामना नव्या खेळपट्टीवर होणार? 

क्रिकबझच्या वृत्तानुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी नवीन खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. दुबईच्या मैदानातच नव्या खेळपट्टीवर दनही संघांमधील महाजंग होणार आहे. यामुळे आता ऑस्ट्रेलिया यावेळी भारतीय फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हे ही वाचा: IND vs AUS Semi-Final: उपांत्य फेरीत पाऊस पडला तर काय होईल? 'या' संघाला मिळेल अंतिम फेरीत प्रवेश

 

कठीण लढत होईल

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महान सामन्यादरम्यान आयसीसी टूर्नामेंटमध्ये थ्रिलचा तिहेरी डोस दिसून येत आहे. या कालावधीत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व दिसून आले असले तरी दोन्ही संघ आतापर्यंत या स्पर्धेत अपराजित आहेत. आता भारतीय संघाला एकदिवसीय विश्वचषक 2023 ची जखम भरून काढण्याची मोठी संधी आहे.

Read More