Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

गौतम गंभीरने LIVE सामन्यात केली शिवीगाळ, लॉर्ड्स टेस्टमधील VIDEO झाला VIRAL

Gautam Gambhir: गौतम गंभीरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो अपशब्द वापरताना दिसत आहे. हा व्हिडीओ लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवसाचा असल्याचे सांगितले जात आहे.   

गौतम गंभीरने LIVE सामन्यात केली शिवीगाळ, लॉर्ड्स टेस्टमधील VIDEO झाला VIRAL

Gautam Gambhir Viral Video: भारत-इंग्लंड लॉर्ड्स टेस्ट चांगलाच रंगतदार ठरत आहे. भारतीय संघ (ind vs eng 3rd test)  इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुन्हा एकदा परदेशात दमदार विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पण या सगळ्याच्या दरम्यान, भारताचे हेड कोच गौतम गंभीरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओत?

लॉर्ड्स टेस्टच्या चौथ्या दिवशीच्या खेळादरम्यानचा हा व्हिडीओ आहे. गंभीर लॉर्ड्सच्या बाल्कनीत बसलेला दिसत आहेत आणि त्याने काहीतरी तिखट बोलला  आहे, जे स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावरून ओळखता येते. त्यांच्या ओठांच्या हालचालींवरून लोकांनी अंदाज बांधला की गंभीरने चक्क अपशब्द वापरले.

गंभीर चिडला तरी का?

नेमकं गौतम गंभीरने हे शब्द कुणाला उद्देशून वापरले, हे स्पष्ट झालेलं नाही. पण व्हिडीओ पाहता असे वाटते की ते आपल्या संघातील खेळाडूंवरच चिडला असावा. कदाचित फील्डिंग प्लेसमेंट किंवा एखाद्या चुका यामुळे त्यांना राग आला असावा. मैदानावर घडलेल्या काही गोष्टींवर ते अस्वस्थ होता, असं समजतं.

 

 

भारत विजयाच्या उंबरठ्यावर

लॉर्ड्स टेस्टवर भारताने जोरदार पकड बनवली आहे. इंग्लंडने भारताला जिंकण्यासाठी 193 धावांचे लक्ष्य दिले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 4 गडी गमावून 58 धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी भारताला अजून 135 धावांची गरज आहे. 6 विकेट शिल्लक आहेत. सध्या सामन्याच्या शेवटच्या दिवसाला सुरुवात झाली आहे. 

गौतम गंभीरच्या कोचिंग कारकिर्दीतील महत्वाचा क्षण

शुभमन गिलचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, पण या सगळ्यात गंभीर यांच्या कोचिंग स्टाईलवरही चर्चा सुरू झाली आहे. मैदानावरची त्यांची आक्रमकता, राग, आणि परत परत चर्चेत येणाऱ्या प्रतिक्रिया यामुळे त्यांच्या शैलीवर लक्ष वेधले गेले आहे.

टीमच्या विजयाच्या अपेक्षेने ताण वाढला

संघाच्या विजयाची जबाबदारी आणि ताण यामुळे कधी कधी कोचच्या प्रतिक्रिया टोकाच्या होतात. गंभीरच्या व्हिडीने याचीच साक्ष दिली आहे. आता सर्वांच्या नजरा पाचव्या दिवशीच्या खेळाकडे लागल्या आहेत.

Read More