Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Video: रोहित शर्माच्या कारकिर्दीवर पाकिस्तानी पत्रकाराने उपस्थित केले प्रश्न , गौतम गंभीरने दिले सडेतोड उत्तर

IND vs AUS: सेमी फायनायमधील विजयानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पत्रकार परिषदेसाठी आला होता.  यावेळी त्यांने पाकिस्तानी पत्रकाराला चोख प्रत्युत्तर दिले.  

Video: रोहित शर्माच्या कारकिर्दीवर पाकिस्तानी पत्रकाराने उपस्थित केले प्रश्न , गौतम गंभीरने दिले सडेतोड उत्तर

Gambhir's Epic Reply to Pak Media: भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (ICC Champions Trophy 2025) सेमी फायनल स्पर्धेत दमदार खेळ दाखवला. बलाढ्य ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) संघाचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली आहे. आता भारतीय संघ 9 मार्चला दुबईत अंतिम सामना खेळणार आहे. भारताच्या विरुद्ध कोण खेळणार हे लवकरच स्पष्ट होईल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे सोपवण्यात आले. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केला नाही. त्यामुळे ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवली जात आहे. भारतीय संघ दुबईत आपले सर्व सामने खेळत आहे. मंगळवारी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यानंतर पत्रकार परिषद झाली त्यावेळी भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला पाकिस्तानी पत्रकाराने रोहित वरून प्रश्न विचारला. 

गंभीरने दिले चोख प्रत्युत्तर 

भारतीय संघ सुरक्षितेच्या कारणामुळे दुबईत आपले सर्व सामने खेळत आहे. अशा स्थितीत एकाच मैदानावर खेळण्याचा फायदा भारताला मिळत असल्याचा आरोप संघावर होत आहे. सेमी फायनयच्या विजयानंतर पत्रकार परिषदेसाठी आलेले मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी या आरोपांना चोख उत्तर दिले. एवढेच नाही तर एका पाकिस्तानी पत्रकाराने त्याला रोहित शर्माच्या करिअरबद्दल विचारले. यावर गंभीरने उत्तर देऊन त्यांची बोलती थांबवली.

हे ही वाचा: स्टीव्ह स्मिथ आऊट होताच गौतम गंभीरला काय झालं? ड्रेसिंग रुममधून शिवी देतानाचा Video Viral

 

काय म्हणाला गौतम गंभीर? 

गौतम गंभीर म्हणाला की, " अंतिम सामना अजून खेळायचा आहे. तुमचा कर्णधार एवढ्या फियरलेस खेळला असता तर ड्रेसिंग रूममध्ये वेगळेच वातावरण दिसले असते. तुम्ही धावांवरून न्याय करा, आम्ही इंम्पॅकटने न्याय बघतो. तुम्ही संख्या आणि आकडेवारी पाहता आणि आम्ही प्रशिक्षक आणि संघ म्हणून आकडे बघत नाही." 

हे ही वाचा: IND vs AUS: घटस्फोटाच्या काही महिन्यातच हार्दिकला मिळाली गर्लफ्रेंड? सिक्सरवर दिली खास प्रतिक्रिया,Video Viral

 

हे ही वाचा: 'इग्नोर कर, झोप तू...' TCS कर्मचारी मानव शर्माची पत्नी आणि बहिणीचे 'त्या' रात्रीचे व्हॉट्सॲप चॅट Viral

 

दुबईत खेळण्याबाबतच्या टीकेवर गंभीर म्हणाला की, " भारतीय संघाने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सराव केला नाही. भारताला दुबईत खेळण्याचा कोणताही अनुचित फायदा झाला नाही. ही जागा आमच्यासाठी जितकी तटस्थ आहे तितकीच ती इतरांसाठी आहे. आम्ही अद्याप या मैदानावर एकदाही सराव केलेला नाही. त्यामुळे कसला अन्यायकारक फायदा? आम्ही आयसीसी अकादमीमध्ये सराव करतो, जिथे परिस्थिती स्टेडियमपेक्षा वेगळी असते. काही लोक नेहमी गोष्टी बाहेर काढतात, त्यांना सुधारण्याची गरज आहे," असे गंभीर म्हणाला.

Read More