Gautam Gambhir Viral Video: अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर आता दोन्ही संघांचे खेळाडू पाचव्या कसोटीत आक्रमक शैलीत दिसण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो संतापलेला दिसत आहे. गौतम गंभीर लंडनच्या लंडनच्या द ओव्हल येथे पिच क्युरेटवर प्रचंड रागावला होता. मंगळवारी भारतीय संघ प्रशिक्षण सराव करत असताना हा प्रकार घडला. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारताचा मुख्य प्रशिक्षक हेड ग्राऊंडमन ली फोर्टिस यांना 'तू फक्त ग्राऊंडमन आहेस' असं सांगत असल्याचं ऐकू आलं. दरम्यान या संघर्षामागील कारण स्पष्ट झालेलं नाही.
भारत आणि इंग्लंड पाचव्या कसोटी सामन्यासाठी तयारी करत असतानाच हा वाद झाला आहे. वाद वाढू लागल्यानंतर गौतम गंभीरने फोर्टिसला म्हटलं की, "आम्ही काय करायचं हे तू सांगू नकोस. तुला हवं ते रिपोर्ट कर, तू फक्त ग्राऊंडमन आहेस". यावेळी गौतम गंभीरने शिव्या घातल्याचंही बोललं जात आहे. यादरम्यान फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक मध्यस्थी करत फोर्टिजशी संवाद साधण्यासाठी पुढे आला होता. पण त्यावेळी गौतम गंभीर संतापलेलाच होता आणि भांडत होता.
VIDEO | Indian team's head coach Gautam Gambhir was seen having verbal spat with chief curator Lee Fortis at The Oval Cricket Ground in London ahead of the last Test match of the series starting Thursday.
— Press Trust of India (@PTI_News) July 29, 2025
After having drawn the fourth Test at Old Trafford, India have a chance… pic.twitter.com/hfjHOg9uPf
हा व्हिडिओ कसोटीपूर्वी भारताच्या सराव सत्रातील आहे. गंभीर असेही म्हणताना ऐकू येतो की, ‘फ*** ऑफ, जा, तुला जे काही सांगायचे आहे ते सांग, तू फक्त ग्राउंड्समन आहेस’.
क्युरेटर: “मला शिवीगाळ करू नकोस, जर तू मला पुन्हा शिवीगाळ केलीस तर मी मॅच रेफ्रीकडे तक्रार करेन.
गंभीर: जा आणि तक्रार कर, तुला जे करायचे आहे ते कर, आता निघून जा.
कोटक आणि क्युरेटर एकमेकांशी बोलतात (शब्द स्पष्ट नाहीत).
गंभीर (कोटकला): “त्याला सांग, त्याला निघून जाण्यास सांग, रेफ्रीकडे तक्रार कर. त्याच्याशी बोलू नकोस.
क्युरेटर: (काही ऐकू येत नाही)
गंभीर: “तू थांब. आम्हाला काय करायचे ते सांगू नकोस. आम्हाला काय करायचे आहे ते तुम्ही ठरवणार नाही.
क्युरेटर: (काही ऐकू येत नाही)
गंभीर: “आम्हाला काहीही सांगू नकोस. तुम्हाला आम्हाला सांगण्याचा अधिकार नाही. तू फक्त ग्राउंड्समन आहेस. तुझ्या मर्यादेत राहा.”
क्युरेटर: (काही ऐकू येत नाही)
गंभीर: “तू फक्त ग्राउंड्समन आहेस. आपल्या मर्यादेत राहा”
यानंतर भारतीय संघाने लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात आयोजित एका कार्यक्रमात हजेरी लावली. येथे गंभीरने कसोटी मालिकेतील संघाच्या कामगिरीवर भाष्य करणारं भाषण दिलं. संघाने उत्कृष्ट खेळ केला आहे आणि प्रत्येक क्रिकेटप्रेमीला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे असं कौतुक त्याने केलं.
या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना गुरुवारी, 31 जुलै रोजी सुरू होईल. भारत हा सामना जिंकून मालिका 2-2 अशी बरोबरी करेल अशी आशा करेल.
बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जॅकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, जॅक क्राउली, लियाम डॉसन, बेन डकेट, जेमी ओवर्टन, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टोंग, क्रिस वोक्स.
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, नारायण मोहम्मद जगदीसन, प्रवीण जैस्वाल, प्रवीण जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक). कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, अंशुल कंबोज, अर्शदीप सिंग.