Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

गौतम गंभीर इंग्लंड दौरा सोडून तडकाफडकी भारतात परतला, नेमकं काय घडलंय?

IND VS ENG Test : टीम इंडियाचा संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफ इंग्लंडला गेला असून तेथे 20 जून पासून टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. मात्र याच दरम्यान एक मोठी बातमी समोर येत असून टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर हा संघाला सोडून भारतात परतला आहे. 

गौतम गंभीर इंग्लंड दौरा सोडून तडकाफडकी भारतात परतला, नेमकं काय घडलंय?

Gautam Gambhir Mother Cardiac Arrest : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवण्यात येणार आहे. यासाठी टीम इंडियाचा संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफ इंग्लंडला गेला असून तेथे 20 जून पासून टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. मात्र याच दरम्यान एक मोठी बातमी समोर येत असून टीम इंडियाचा (Team India) हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) हा संघाला सोडून भारतात परतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार गौतम गंभीरच्या आईला हार्ट अटॅक आला असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

गौतम गंभीर हा 7 जून पासून लंडन दौऱ्यावर आहे. सध्या संघ बेकेनहॅममध्ये सराव करत असून इथे इंट्रा-स्क्वाड सराव सामना खेळवला जात आहे. परंतु यादरम्यान फॅमिली इमर्जंसीमुळे गंभीरला अचानकपणे भारतात परतावं लागलं. मात्र तो 20 जून पासून सुरु होणाऱ्या पहिल्या टेस्ट सामन्यासाठी इंग्लंडमध्ये पोहोचेल अशी माहिती आहे. 

गौतम गंभीरच्या आईची तब्येत आता कशी आहे?

गौतम गंभीरच्या आईचं नाव सीमा गंभीर असं असून त्यांना हार्ट अटॅक आल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या त्या आयसीयूमध्ये असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. भारतात आलेला गौतम गंभीर 17 जून रोजी पुन्हा इंग्लंडला रवाना होईल. भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचा पहिला टेस्ट सामना हा लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट ग्राउंडवर होईल. 

गौतम गंभीरचं कुटुंब हे सध्या दिल्लीमध्ये राहतं. गंभीरच्या वडिलांचं नाव दीपक असून त्यांचा टेक्सटाइल्स बिझनेस आहे. तर गंभीरची आई सीमा या हाउस वाइफ आहेत. गंभीरला एक लहान बहीण सुद्धा असून तिचं नाव एकता आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये गंभीरने नताशा जैन सोबत लग्न केलं.  

हेही वाचा : हे पाठीत खंजीर खुपसण्यासारखं... फायनलमध्ये पराभवानंतर श्रेयस अय्यर असं का म्हणाला?

 

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिज वेळापत्रक : 

भारत विरुद्ध इंग्लंड पहिला सामना : 20 ते 24 जून 
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा सामना  : 2 ते 6 जुलै 
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा सामना  : 10 ते 14 जुलै 
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा सामना  :  23 ते 27 जुलै 
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना : 31 जुलै ते 4 ऑगस्ट 

Read More