IND vs ENG: भारताने ओव्हलमध्ये झालेला पाचवा कसोटी सामना केवळ 6 धावांनी जिंकला आणि संपूर्ण मालिका 2-2 अशी बरोबरीत रोखली. पण या विजयाच्या जल्लोषात सगळ्यात लक्ष वेधलं ते टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांच्या सेलिब्रेशनने. शांत, कठोर चेहरा आणि थेट बोलणारा गंभीर या वेळी काहीसा वेगळ्याच रूपात दिसला. यावेळी त्याचं उत्साहानं भरलेला, भावनांनी ओसंडून वाहणारा आणि जल्लोष करत बिनधास्त असा अंदाज सगळ्यांचं भावला.
भारताच्या विजयाच्या क्षणी, विशेषतः मोहम्मद सिराजने शेवटची यॉर्कर टाकत गडी बाद करताच गंभीरने जणू काही सगळा संयम गमावला तो अक्षरश: ओरडले, उड्या मारल्या, बॉलिंग कोचच्या गळ्यात पडला आणि ड्रेसिंग रूमचा प्रत्येक कोपरा त्यांच्या जल्लोषानं भरून गेला. डोळ्यांतून अश्रू वाहताना दिसले आणि त्यांच्या त्या अनोख्या रूपानं सगळेच थक्क झाले.
THE RAW EMOTIONS & HAPPINESS OF TEAM INDIA AFTER WON OVAL TEST.
— Tanuj (@ImTanujSingh) August 4, 2025
- Video of the series!
pic.twitter.com/gWjLvBtB8i
या मालिकेपूर्वी गंभीरच्या कोचिंगवर बराच वाद सुरु होता. त्याच्या कार्यकाळात टीम इंडियाला काही मोठे अपयश अनुभवायला मिळाले. घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून हार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात लाजीरवाणी कामगिरी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून बाहेर पडणं. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या कोचिंगवर बोट ठेवलं होतं. पण इंग्लंडविरुद्ध अखेरच्या कसोटीत मिळालेला हा थरारक विजय गंभीरसाठी एक मोठं उत्तर ठरला.
या ऐतिहासिक विजयामागे सर्वात मोठं योगदान होतं मोहम्मद सिराजचं. शेवटच्या दिवशी त्याने भेदक मारा करत इंग्लंडच्या फलंदाजांना अक्षरशः झोपवलं. जेमी स्मिथचा बळी घेतल्यावर त्याने सामन्यावर पकड घट्ट केली आणि अखेरच्या क्षणाला निर्णायक यॉर्कर टाकत सामना जिंकून दिला. संपूर्ण मालिकेत 23 विकेट घेतल्याने तो मालिकेतील टॉप बॉलर ठरला.
पाचव्या टेस्ट सामन्यात कोण ठरला 'प्लेअर ऑफ द मॅच'?
मोहम्मद सिराजला शेवटच्या टेस्ट सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला. त्याने या सामन्यात एकूण9 विकेट घेतले.
भारत - इंग्लंड टेस्ट सीरिजमध्ये कोण ठरलं 'प्लेअर ऑफ द सीरिज'?
भारताचा कर्णधार शुभमन गिल याला प्लेअर ऑफ द सीरिज पुरस्कार देण्यात आला. त्याने या सामन्यात एकूण 754 धावा केल्या.
भारताने ओव्हल मैदानावर आतापर्यंत किती सामने जिंकेल?
ओव्हल मैदानावर भारताने आतापर्यंत एकूण 16 टेस्ट सामने खेळले आहेत. यापैकी केवळ तीन सामने टीम इंडियाने जिंकलेत.