RCB vs KKR: बंगळूरूच्या चिन्नस्वामी मैदानावर रॉयल चॅलेंजर बंगळूरू आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने सामने आहेत. हा सामना स्पेशल आहे याचं कारण म्हणजे विराट कोहली आणि गौतम गंभीरमुळे. गेल्यावर्षी आरसीबी आणि केकेआरच्या सामन्यानंतर या दोन्ही खेळाडूंमध्ये मोठा वाद झाला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही खेळाडू समोरासमोर आल्यावर काय होतं हे चाहत्यांना पाहायचं होतं. मात्र चाहत्यांना याचं वेगळंच चित्र पहायला मिळालं.
कोलकाता विरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीने उत्तम फलंदाजी केली. यावेळी स्ट्रॅटेजिक टाईम आऊटदरम्यान मोठी घटना पहायला मिळाली. या अडीज मिनिटांच्या ब्रेकमध्ये कोहली आणि गंभीर एकमेंकासमोर आले आणि त्यांनी चक्क मिठी मारली. या दोघांच्यागी गळाभेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. चाहत्यांना मात्र हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे.
You won’t see action today
— (@Retired__hurt) March 29, 2024
Virat kohli & gautam gambhir #RCBvsKKR #ViratKohli #GautamGambhir pic.twitter.com/IFZoEKMjeH
फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), वेंकटेश ऐयर, श्रेयस ऐयर (कर्णधार), रमनदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरिन, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्थी
विराट कोहली, फाफ डु प्लेसी (कर्णधार), कॅमरन ग्रीन, राजत पटिदार, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अल्जारी जोसेफ, मयंक दागर, मोहम्मद सिराज, यश दयाल