Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Asia Cup स्पर्धेत श्रीलंकेची बाजी, Gautam Gambhir च्या कृतीने जल्लोष; पाहा Video

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या कृतीने श्रीलंकन प्रेक्षकांची मनं जिंकली.

Asia Cup स्पर्धेत श्रीलंकेची बाजी, Gautam Gambhir च्या कृतीने जल्लोष; पाहा Video

Asia Cup 2022: आशिया कप 2022 स्पर्धेपूर्वी चषकाचं दावेदार म्हणून भारत आणि पाकिस्तान या संघाकडे पाहिलं जात होतं. मात्र अपेक्षेप्रमाणे श्रीलंकन खेळाडूंनी कामगिरी करत आशिया कप चषकावर नाव कोरलं. अंतिम फेरीत पाकिस्तान संघाचा 23 धावांनी पराभव केला. या विजयानंतर श्रीलंकन संघानं आशिया कप चषक सहाव्यांदा पटकावला आहे. मात्र असं असलं तरी भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या कृतीने श्रीलंकन प्रेक्षकांची मनं जिंकली. गौतम गंभीरचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

श्रीलंकेनं अंतिम सामना जिंकल्यानंतर गौतम गंभीरनं श्रीलंकेचा हातात घेऊन प्रेक्षकांना दाखवला. या कृतीनंतर श्रीलंकेच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. हा व्हिडीओ गौतम गंभीरनं आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. तसेच पोस्ट करताना लिहिलं आहे की, "Superstar team...Truly deserving!!#CongratsSriLanka."

पाकिस्तान संघ तिसऱ्यांदा आशिया कपावर नाव कोरण्यापासून हुकला आहे. श्रीलंकेच्या विजयाचा शिल्पकार भानुका रजपक्षा ठरला आहे.  23 धावांनी श्रीलंकेने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. श्रीलंकेच्या 170 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाचा डाव श्रीलंकेच्या गोलंदाजांनी 147 धावांवर गुंडाळला. श्रीलंकेकडून प्रमोद मधूशनने 4 विकेट्स, वानिंदू हसरंगाने 3 तर करूणारत्नेने 2 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानतर्फे मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 52 धावांची अर्धशतकी खेळी केली.

Read More