Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

टी-२० स्पर्धेत अँकरिंग करणार ही माजी मिस ऑस्ट्रेलिया, मुंबईच्या प्लेयरची गर्लफ्रेंड

माजी मिस ऑस्ट्रेलिया एरिन हॉलंड लवकरच टी-२० स्पर्धेत अँकरिंग करताना दिसणार आहे. 

टी-२० स्पर्धेत अँकरिंग करणार ही माजी मिस ऑस्ट्रेलिया, मुंबईच्या प्लेयरची गर्लफ्रेंड

मुंबई  : माजी मिस ऑस्ट्रेलिया एरिन हॉलंड लवकरच टी-२० स्पर्धेत अँकरिंग करताना दिसणार आहे. तसेच एरिन ही प्रसिद्ध ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर बेन कटिंगची गर्लफ्रेंड आहे. यामुळे एरिनबाबत क्रिकेटच्या फॅन्समध्ये उत्सुकता वाढलीये. एरिनला जगातील सुंदर महिलांपैकी एक मानले जाते. २०१३मध्ये झालेल्या मिस ऑस्ट्रेलिया स्पर्धेचा किताबही तिने मिळवला होता. गेल्या दोन-तीन वर्षांपासून बेन आणि एरिन रिलेशनशिपमध्ये आहेत. लवकरच हे दोघ लग्नही करतील अशी चर्चा आहे. 

बेन कटिंग टी-२० स्पर्धेच्या ११व्या हंगामात मुंबईकडून खेळतोय. तो संघातील एक ऑलराऊंडर क्रिकेटर आहे. एरिनच्या मते ती बेनला खेळताना पाहू शकत नाही. जेव्ही ती त्याला खेळताना पाहते तेव्हा ती खूप भावुक होते. यासाठी तिने बेनला फार कमी वेळा खेळताना पाहिलेय. एरिन मॉडेल आणि अँकर होण्यासोबतच चांगली सिंगर आणि डान्सरही आहे. 

 

बेन कटिंगला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड आहे. क्रिकेट हा त्याचा नेहमीच फेव्हरिट राहिला आहे. टी-२० स्पर्धेत अँकरिंग कऱण्याआधी एरिनने खूप रिसर्च केला. स्पर्धेतील संघ तसेच खेळाडूंबाबत माहितीही गोळा केली.

टी-२० स्पर्धेत मुंबईला अद्याप विजयाचा सूर गवसलेला नाहीये. चौथ्या सामन्यात त्यांच्यासमोर बंगळूरुचा संघ असणार आहे. हा सामना मुंबई घरच्या मैदानावर खेळणार आहे. त्यामुळे मुंबई विजयी सलामी देईल अशी आशा मुंबईच्या चाहत्यांना आहे.

Read More