Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Glenn Maxwell retirement: ग्लेन मॅक्सवेलने घेतली वनडे क्रिकेटमधून निवृत्ती, कारण...

Glenn Maxwell has announced his retirement from ODI cricket: ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेलने टी-२० वर लक्ष केंद्रित करण्यासाठी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.   

Glenn Maxwell retirement: ग्लेन मॅक्सवेलने घेतली वनडे क्रिकेटमधून निवृत्ती, कारण...

Glenn Maxwell has announced his retirement: ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने एक मोठा निर्णय घेतला आहे. मॅक्सवेलने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून आता तो पूर्ण लक्ष टी20 क्रिकेटकडे केंद्रित करणार आहे. टी२० वर्ल्ड कप 2026 भारत आणि श्रीलंकेत होणार असून त्यासाठीची तयारी आणि इतर लीग स्पर्धांमध्ये सहभाग हे आता मॅक्सवेलच्या टार्गेटवर असेल.

मॅक्सवेलची कारकीर्द 

गेल्या काही वर्षांत आक्रमक फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजीसाठी ओळखला जातो. मॅक्सवेलने वनडे फॉरमॅटमध्ये 149 सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने 3990 धावा केल्या असून त्यात 4 शतके आणि 23 अर्धशतके आहेत. गोलंदाजीतही त्याने 77 विकेट्स घेतले असून त्यात चार वेळा एका डावात 4 विकेट्स  घेतल्या आहेत.  यावरून त्याची अष्टपैलू कामगिरी दिसून येते. 

 

कोणता सामना ठरला शेवटचा? 

36 वर्षीय मॅक्सवेलने नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर हा निर्णय घेतला. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर तो मॅक्सवेलचा शेवटचा वनडे सामना ठरला.

 

आता कोणते सामने खेळणार?

आता मॅक्सवेल टी२० वर्ल्ड कप 2026, बिग बॅश लीग, आणि इतर आंतरराष्ट्रीय टी20 लीगमध्ये आपली जादू दाखवणार आहे. टी20 स्पर्धांमध्ये मॅक्सवेलच्या आक्रमक शैलीची सगळ्यांचं नेहमीच भुरळ पडते. ही निवृत्ती वनडे प्रेमींसाठी जरी निराशाजनक असली तरी टी20 चाहत्यांसाठी मात्र नक्कीच दिलासादायक ठरणार आहे.

Read More