Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Neeraj Chopra : गोल्डन बॉयचा विश्वविजेत्या पोरींना झुकून सलाम, आयसीसीने शेअर केला Video

फायनलमध्ये विजय मिळवल्यावर गोल्डन बॉयने इतिहास रचणाऱ्या मुलींना झुकुन सलाम केला.

Neeraj Chopra : गोल्डन बॉयचा विश्वविजेत्या पोरींना झुकून सलाम, आयसीसीने शेअर केला Video

Neeraj Chopra Salute U-19 World Cup Winner Women Team : नुकताच पार पडलेल्या अंडर-19 महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये टीम इंडियाने इंग्लंड संघाचा पराभव करत इतिहास रचला. महिला क्रिकेटचा हा पहिला वर्ल्ड कप असून याआधी वरिष्ठ महिला संघाला तीन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. या सामन्याआधी भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राने संघातील खेळाडूंची भेट घेत त्यांचं मनोबल वाढवलं होतं. फायनलमध्ये विजय मिळवल्यावर गोल्डन बॉयने इतिहास रचणाऱ्या मुलींना झुकुन सलाम केला. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

फायनलच्या सामन्याआधी नीरजने मुलींची भेट घेत त्यांना काही सल्ले दिले होते. त्यानंतर मैदानात बसून त्याने संपूर्ण सामना पाहिला आणि विनिंग शॉटचा व्हिडीओही पोस्ट केला. विश्वविजेत्या वाघिणींना मैदानात जात गोल्डन बॉयने वाकून सलाम केला. नीरज चोप्राचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आयसीसीनेही आपल्या अधिकृत पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Read More