Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

धक्कादायक! स्टार टेनिसपटू राधिका यादवची हत्या, वडिलांनीच झाडल्या गोळ्या

Radhika Yadav Murder : गुरुग्राममधील स्टार टेनिसपटूची तिच्या वडिलांनी गोळी झाडून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.   

धक्कादायक! स्टार टेनिसपटू राधिका यादवची हत्या, वडिलांनीच झाडल्या गोळ्या

Radhika Yadav Murder : गुरुग्राममधील स्टार टेनिसपटू राधिका यादवची गोळी मारून हत्या करण्यात आली. या घटनेनं क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट ही की राधिकाच्या हत्या कोणत्या अज्ञात व्यक्तीने नाही तर राधिकाच्या वडिलांनी केली आहे. ही घटना राधिका राहत असलेल्या सुशांत लोक-2 मधील निवास्थानावर झाली आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतलं असून या घटनेबाबत पुढील  चौकशी सुरु आहे. 

गोळी लागल्यावर राधिकाला गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे तिला मृत घोषित करण्यात. अद्याप या घटनेमागची सत्यपरिस्थिती समोर आलेली नाही. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी आणि तपास करत आहेत. सदर घटना ही दुपारी 12 दरम्यान घडली असून सेक्टर 57 मधील घरी घडली जिथे राधिका तिच्या कुटुंबासोबत राहत होती.  आरोपी वडिलांनी आपल्या मुलीवर लागोपाठ तीन गोळ्या झाडल्या. गुरुग्राम पोलिसांनी हत्या करणाऱ्या वडिलांना अटक केली असून त्यांच्याकडून बंदूक सुद्धा ताब्यात घेण्यात आली ज्याने राधिकावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. 

हेही वाचा : कॅप्टन गिलच्या Plan B मध्ये फसले इंग्रज, नितेश रेड्डीच्या 4 बॉलमध्ये पलटची मॅच, Video

 

राधिका यादव ही राज्यस्तरीय स्टार टेनिसपटू होती जिने अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार रील बनवण्यावरून वाद सुरु झाला आणि वडिलांकडून मुलीवर गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यात तिचा मृत्यू झाला होता. 

राधिका यादव कोण होती? 

राधिका यादव ही आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ (ITF) मध्ये युगल टेनिसपटू म्हणून 113 रँकिंगवर होती. असं सांगितलं जातं की  राधिका यादवचा जन्म 23 मार्च 2000 रोजी झाला होता. 

Read More