Cricket News : बुधवारी महिला वर्ल्ड कप क्वालिफायर सामन्या दरम्यान असं काही घडलं जे पाहून सर्वच थक्क झाले. यजमान पाकिस्तानच्या आयोजनाखाली 9 पासून महिला वर्ल्ड कपचा क्वालिफायर सामन्याला सुरुवात झाली. स्पर्धेत सुरुवातीचे दोन दिवस सामने खेळले गेले. यजमान पाकिस्तानने आयर्लंडला 38 धावांनी हरवलं. त्यानंतर स्कॉटलँड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना झाला.
बुधवारी झालेला सामान पाहताना सर्व तेव्हा थक्क झाले जेव्हा वेस्टइंडीजची दिग्गज फलंदाज आणि कर्णधार हेली मॅथ्यूज ही वेदनेने कळवळत आधी मैदानाच्या बाहेर निघून गेली आणि मग तिने पुन्हा मैदानात येऊन शतक ठोकले. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये वेस्टइंडीज विरुद्ध स्कॉटलँड यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात टॉस जिंकून वेस्टइंडीजने प्रथम गोलंदाजी निवडली. यावेळी स्कॉटलँडची सलामी फलंदाज एबी एटकेन-ड्रमंडने २१ आणि डार्सी कार्टरने 25 धावा केल्या आणि 48 धावांची पार्टनरशिप केली. वेस्टइंडीजने कर्णधार हेली मॅथ्यूजद्वारे पुनरागमन केले. हेली मॅथ्यूजने 12 व्या आणि 14 व्या ओव्हरमध्ये एटकेन-ड्रमंड आणि कॅथरीन ब्रायस या दोघांना बाद केले. मॅथ्यूजने एकूण चार विकेट घेतले. मात्र तरीही स्कॉटलँडने 244 धावा केल्या.
वेस्टइंडीजला विजयासाठी 245 धावांचं टार्गेट मिळाल्यावर हेली मॅथ्यूज ही मैदानात आली आणि जॅदा जेम्स (45) सोबत मिळून तिने वेस्टइंडीज सोबत पार्टनरशिप करून 120/1 इथपर्यंत स्कोअर पोहोचवला. त्यानंतर स्कॉटलँडने मगोपाठ विकेट काढून सामन्यात पुनरागमन केले. मात्र त्यानंतरही हेली मॅथ्यूजने संघर्ष सुरु ठेवला आणि दमदार शतक ठोकले.
Cramps couldn’t stop her. But the scoreboard did
FanCode (FanCode) April 9, 2025
Hayley Matthews battled pain to score a heroic 114 and take West Indies deep into the chase — but they fell agonisingly short of Scotland's total HayleyMatthews #WIvSCO #WWCQ pic.twitter.com/RXEcB2fxec
वेस्टइंडीजचे फलंदाज स्कॉटलँडच्या गोलंदाजी समोर संघर्ष करत असताना कर्णधार हेली मॅथ्यूजला दुखापतीमुळे मैदानातून स्ट्रेचरवर बाहेर नेण्यात आले. मात्र जेव्हा वेस्टइंडीजची अवस्था अधिकच बिकट झाली आणि त्यांची आठवी विकेट पडली तेव्हा मॅथ्यूज वेदनेत असताना सुद्धा मैदानात आली आणि तिने तुफान फलंदाजी केली. यादरम्यान तिने शतक पूर्ण केले. परंतु झुंज देऊन सुद्धा अखेर वेस्टइंडीजचा संघ 47 व्या ओव्हरला 233 धावांवर ऑल आऊट झाला.