Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs SA : टीम इंडियाचं काय चुकलं? हरभजन सिंगने रोहितला दिला सल्ला, म्हणाला 'अजिंक्य रहाणेला जर...'

Harbhajan Singh Statement : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) निवड का झाली नाही आणि चेतेश्वर पुजारालाही (Cheteshwar Pujara) कोणत्या कारणास्तव वगळण्यात आलंय? हे मला समजलं नाही, असं हरभजन सिंगने म्हटलं आहे.

IND vs SA : टीम इंडियाचं काय चुकलं? हरभजन सिंगने रोहितला दिला सल्ला, म्हणाला 'अजिंक्य रहाणेला जर...'

Harbhajan Singh On Ajinkya Rahane :  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना (IND vs SA 1st Test) सेंच्युरियनमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव झाला. टीम इंडियाच्या सुमार कामगिरीमुळे आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत. काहींनी टीम इंडियाच्या सिलेक्शनवर टीका केली तर काहींनी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कॅप्टन्सीवर प्रश्न विचारले. अशातच आता टीम इंडियाचा माजी स्टार गोलंदाज हरभजन सिंग (Harbhajan Singh Statement) याने एका युट्यूब चॅनेलवर प्रतिक्रिया दिली आहे.

हरभजन सिंग भडकला...

आमच्याकडे अजूनही कसोटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजारापेक्षा चांगला फलंदाज नाही. चेतेश्वर पुजारा हळू खेळू शकतो, पण तो तुम्हाला संकटातून वाचवतो आणि त्यामुळेच आम्ही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या भूमीवर कसोटी जिंकला आहात. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी परदेशात सर्वत्र धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणेची निवड का झाली नाही आणि चेतेश्वर पुजारालाही कोणत्या कारणास्तव वगळण्यात आलंय? हे मला समजलं नाही, असं म्हणत हरभजन सिंगने टीम इंडियाच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

टीम इंडियाच्या टेस्टची वॉल म्हटल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनाही यंदाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत संधी मिळाली नाही. त्यामुळे सिलेक्शनवेळी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. अशातच आता पहिल्या सामन्यात देखील त्यांचं अनुपस्थिती जाणवू लागली होती.

आणखी वाचा - "विराट कोहलीला टेस्टचा कॅप्टन करा, कमकुवत रोहित शर्माने काय केलं?"

दरम्यान, टेम्बा बावुमा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमधून बाहेर पडला आहे. टेम्बा बावुमाच्या अनुपस्थितीत सेंच्युरियनमध्ये 185 रन्सची मॅचविनिंग इनिंग खेळणाऱ्या डीन एल्गरकडे कारकिर्दीतील शेवटच्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेची कमान सोपवण्यात आलीये. तर बावुमाच्या जागी झुबेर हमजाचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

Read More