Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

हरभजन सिंहने मागितली जाहीर माफी, IPL मध्ये 17 वर्षांपूर्वी केलेल्या कृत्याबाबत झाली उपरती

IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनला 22 मार्च पासून सुरुवात झाली आहे. आयपीएलच्या मैदानात कधी खेळाडू नवनवीन रेकॉर्डस् बनतात तर कधी त्यांच्यात झालेल्या भांडणाची देखील भरपूर चर्चा होते. 

हरभजन सिंहने मागितली जाहीर माफी, IPL मध्ये 17 वर्षांपूर्वी केलेल्या कृत्याबाबत झाली उपरती

IPL 2025 : जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनला 22 मार्च पासून सुरुवात झाली आहे. आयपीएलच्या मैदानात कधी खेळाडू नवनवीन रेकॉर्डस् बनतात तर कधी त्यांच्यात झालेल्या भांडणाची देखील भरपूर चर्चा होते. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात चर्चित भांडणांपैकी एक आहे हरभजन सिंहचा 'थप्पड कांड'. आयपीएल 2008 च्या सीजनमध्ये हरभजन सिंह (Harbhajan Singh) आणि एस श्रीसंत (Shreesanth) यांच्यात वाद झाला. या दरम्यान भज्जीने भर मैदानात श्रीसंतच्या कानशिलात लगावली होती. मात्र या घटनेला 17 वर्ष उलटून गेल्यावर हरभजन सिंहला त्याने केलेल्या या कृत्याची उपरती झाली आहे. 

हरभजन सिंह आणि एस श्रीसंत यांच्यात झालेल्या 'थप्पड कांड' चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. आयपीएल 2025 सुरू असताना सुद्धा एका यूजरने हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून भज्जीला टॅग करत, 'याबाबत काय म्हणालं' असा प्रश्न विचारला. यावर हरभजन सिंहने उत्तर दिलं, 'भाई हे बरोबर नव्हतं. माझी चूक होती. असं व्हायला नको होतं. पण चूक झाली. मी माणूस आहे देव नाही'. भज्जीने आपल्या उत्तरासोबत हात जोडणारे इमोजी टाकले. 

मुंबई विरुद्ध पंजाब सामन्यात झाली घटना : 

25 एप्रिल 2008 मध्ये झालेल्या मुंबई इंडियास विरुद्ध किंग्स 11 पंजाब यांच्यात झालेल्या आयपीएल सामन्यात ही घटना घडली होती. मोहालीमध्ये हा सामना खेळवला गेला होता. सामना संपल्यावर अवॉर्ड सेरेमनी दरम्यान हरभजन सिंहने मैदानात पंजाब संघातील स्टार खेळाडू एस श्रीसंत याच्या कानशिलात लगावली होती.  भज्जी आणि श्रीसंत यांच्यात वाद तेव्हा झाला जेव्हा पंजाबने मुंबईला 66 धावांनी पराभूत केलं होतं. खेळाडू एकमेकांशी सामना संपल्यावर हस्तांदोलन करत होते. यावेळी श्रीसंतने भज्जीला काहीतरी म्हटले. यामुळे तो चिडला आणि त्याने श्रीसंतच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. 

हेही वाचा :  IPL 2025 : MI च्या चाहत्यांसाठी खुशखबर! जसप्रीत बुमराहच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, समोर आला Video

बीसीसीआयने यानंतर सदर घटनेची चौकशी केली आणि त्यात हरभजन सिंह दोषी आढळल्याने लगेचच त्यावर कारवाई करण्यात आली. हरभजनला आयपीएल 2008 च्या 11  सामन्यातून निलंबित करण्यात आले होते. तसेच त्याची संपूर्ण मॅच फी सुद्धा जप्त करण्यात आली होती. 

 

Read More