Cricket : भारताचे दोन दिग्गज ऑफ स्पिनर गोलंदाज रविचंद्रन अश्विन (R Ashwin) आणि हरभजन सिंह (Harbhajan Singh)हे दोघे अव्यक्त शत्रुत्वाबाबत सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असायचे, हरभजन सिंह आणि अश्विन हे दोघे त्यांच्या काळात भारतीय संघासाठी खेळले आणि त्यांनी संघासाठी त्या त्यावेळी मोठं योगदान दिलं. त्यांच्या 'लव्ह हेट रिलेशनशिप' बाबत तुम्ही बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील. अश्विनने भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून आपली कारकीर्द संपवली, तर हरभजन गेल्या 5-7 वर्षांत भारतातील खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांसाठी किती अनुकूल आहेत याबद्दल बोलला.
काही लोकं असा देखील दावा करतात की हरभजन सिंह हा भारतीय संघासाठी आर अश्विनने जे योगदान दिलं त्यावर जळतो. कारण अश्विन सुद्धा ऑफ स्पिनरच होता. आर अश्विनने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये हरभजन सिंह आणि अश्विन हे दोन्ही दिग्गज समोरासमोर बसले आहेत. यात त्यांनी सोशल मीडियावरील अफवांना पूर्णविराम द्यायचा निर्णय घेतला. अश्विनच्या युट्युब चॅनेलवर 'कुट्टी स्टोरीज' नावाचा टिझर लाँच झाला आहे. यात अश्विन म्हणाला की, 'प्रथम मी या संपूर्ण मत्सराच्या गोष्टीचे उत्तर देतो. लोक प्रत्येक गोष्ट त्यांच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहतात. उदाहरणार्थ, जर ते माझ्यावर टिप्पणी करत असतील तर त्यांना वाटते की इतर लोकही त्यांच्या नजरेतून जग पाहतील'.
अश्विन यांनी हरभजन सिंग यांना या विषयाबद्दलही प्रश्न विचारला आणि आपले मत व्यक्त केले. अश्विन म्हणाले की, 'मत्सर' ही बाब लोकांच्या स्वतःच्या वृत्ती आणि मानसिकतेमुळे येते. काही लोकांना असे वाटते की प्रत्येकजण जगभरातील प्रत्येकाशी असलेल्या त्यांच्या वृत्तीचा विचार करेल, परंतु तसे नाही. अश्विनने जोर देऊन म्हटले, "ही संपूर्ण मत्सराची गोष्ट आहे, मी तुम्हाला उत्तर देण्यापूर्वी मला हे स्पष्ट करायचे आहे. 'लोक प्रत्येक गोष्टीकडे त्यांच्या दृष्टीकोनातून पाहतात. उदाहरणार्थ, जर ते माझ्यावर काही टिप्पण्या देत असतील तर त्यांचा असा विश्वास असतो की इतरही जग त्याच दृष्टीने पाहतील'.
हरभजन सिंहने अश्विनला विचारलं की, 'तुला वाटतं का मी तुझ्यावर जळतो? तू आज माझ्यासोबत बसलायस आणि सविस्तर बोललो आहे. तुला वाटतं का की मी तशा प्रकारचा व्यक्ती आहे? अश्विनने हरभजनच्या या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटले की, 'भलेही तुम्हाला एकवेळ माझ्याबाबत मत्सर वाटलं असेल, मला वाटतं तसं होऊ देखील शकतं. हाच मुद्दा आहे आणि मी याला कधीही चुकीचं मानणार नाही. कारण आपण सर्व माणूस आहोत. स्वाभाविकपणे हे होणं निश्चित आहे. काही लोकांचं तर असं ही म्हणणं आहे की मी निवृत्ती घेतली कारण वॉशिंग्टन सुंदर सध्या चांगलं करतोय. हे सगळं दुसऱ्यांचा बघण्याचा दृष्टीकोण आहे'.