Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2021: आनंद गगनात मावेना! हरभज सिंहचा जबरदस्त 'भांगडा', व्हि़डीओ व्हायरल

हरभजन सिंह KKR संघातून खेळताना दिसणार आहे.

IPL 2021: आनंद गगनात मावेना! हरभज सिंहचा जबरदस्त 'भांगडा', व्हि़डीओ व्हायरल

मुंबई: दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत आहे. तीन संघांमध्ये कोरोना शिरला आहे. CSKच्या क्रिएटीव्ह टीममधील एकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्समधील स्पिनर अक्षर पटेलला देखील कोरोनाची लागण झाली आहे. यंदाच्या IPLवर कोरोनाचं सावट आहे. हरभज सिंहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

हा व्हिडीओ KKRने देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. KKRच्या जर्सीमध्ये हरभजन सिंह आनंदात भांगडा करताना दिसत आहे. हा आनंद गगनात मावेनासा झाल्यानं भांगडा करून भजीनं आनंद साजरा केला आहे. हरभजन सिंहला आनंद होण्यामागे कारणही तेवढंच खास आहे. 

हरभज सिंहची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून तो केकेआर संघात सामिल झाला आहे. तो आता संघासोबत राहणार असून तिथेच सराव करणार आहे. 9 एप्रिलपासून IPLचे सामने सुरू होत आहेत. 7 दिवस क्वारंटाइन राहिल्यानंतर हरभजन सिंहची चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याचा आनंद झाल्यानं हॉटेलमधून आनंदात भांगडा करत निघताना हरभजन सिंह दिसला. त्याच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

TAGS

Read More