Harbhajan Singh on Shubman Gill: अनेक काळापासून चर्चेत असलेली इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा शनिवारी करण्यात आली. विराट आणि रोहितच्या निवृत्तीनंतर आता भारतीय संघाची धुरा कोणाकडे जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेरीस इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाला कर्णधार मिळाला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली यंदा भारतीय संघ खेळणार आहे. उपकर्णधार ऋषभ पंतची निवड करण्यात आली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण खेळाडूंना संधी मिळाली आहे, करुण नायर अनेक वर्षांनी संघात परतला आहे. तर जसप्रीत बुमराहचाही संघात समावेश आहे. या घोषणेनंतर, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचे एक मोठे विधान आले आहे, त्याने म्हटले आहे की भारत ही मालिका गमावण्याची शक्यता आहे.
इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर होताच माजी ऑफ-स्पिनर हरभजन सिंगने थेट प्रतिक्रिया नोंदवली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील खेळण्याबद्दल म्हणाला की, "सर्वप्रथम, शुभमन गिलचे खूप खूप अभिनंदन, जो पंजाबमधून देशाचा पहिला कर्णधार बनला आहे. त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन, टीम इंडियाचे नेतृत्व करणे हा प्रत्येकासाठी एक मोठा क्षण असतो. आयपीएल सुरू झाल्यापासून गेल्या 2 महिन्यात, ऋषभ पंतसाठी सर्वात चांगली बातमी म्हणजे तो उपकर्णधार झाला आहे. कारण आयपीएल त्याच्यासाठी चांगले गेले नाही."
हे ही वाचा: IPL प्लेऑफपूर्वी विराट कोहली अयोध्येत; अनुष्का शर्मासोबत घेतले रामलल्लाचे दर्शन, VIDEO VIRAL
हरभजन सिंह पुढे म्हणाला की, "पहिल्यांदाच एक संपूर्ण तरुण संघ जात आहे. संघ सध्या बदलाच्या टप्प्यात आहे. या दौऱ्याच्या आधारावर या तरुण खेळाडूंना जज करू नका. शुभमन गिल हा कसा कर्णधार आहे? कदाचित असं होऊ शकतं की टीम इंडिया जिंकू शकत नाही, पण प्रत्येक वेळी जिंकणे आवश्यक नाही. कधीकधी पराभवही तुम्हाला काहीतरी शिकवतो. मी असे म्हणत नाही की टीम इंडिया लढणार नाही पण इंग्लंडमधील परिस्थितीत जिंकणं थोडं कठीण होईल.जर संघाने चांगला खेळ केला, तर नक्कीच विजय मिळवता येईल.”
हे ही वाचा:: IPL 2025 जिंकणाऱ्या संघाला किती मिळणार बक्षिसाची रक्कम? Playoff मधील संघांनाही मिळणार भरघोस पैसे
हरभजन यांनी चाहत्यांना सल्ला दिला आहे की, "या मालिकेच्या आधारे शुभमन गिल किंवा अन्य तरुण खेळाडूंवर अंतिम मत तयार करू नये. त्यांच्या मते, ही मालिका हा या नव्या संघासाठी शिकण्याचा टप्पा असणार आहे."
हे ही वाचा: IPL चा एक सामना हरल्यावर किती रुपयांचं नुकसान होतं? समजून घ्या ‘कोट्यवधींचं गणित'
कप्तान: शुभमन गिल
उपकप्तान/विकेटकीपर: ऋषभ पंत
यशस्वी जायसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.