Jasmin Walia and Hardik Breakup: टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्याचा प्रेमप्रकरणांमध्ये पुन्हा एकदा प्रेमभंग झाला आहे. नताशा स्टॅन्कोव्हिचपासून विभक्त झाल्यानंतर पंड्या एका नव्या नात्यात गुंतल्याचं बोललं जात होतं. मात्र आता त्याचे आणि ब्रिटीश सिंगर जैस्मिन वालियाच्या जवळीकीवरही विराम लागल्याचं संकेत मिळत आहेत. जैस्मिन वालिया अलीकडच्या काळात अनेकदा संघाच्या फॅमिली बसमधून प्रवास करताना, हार्दिकचे सामने बघताना दिसली होती. तेव्हापासून त्यांच्या नात्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
हार्दिक आणि जैस्मिनच्या अफेअरच्या चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरु होत्या. दोघंही अनेकदा एकत्र दिसले होते. जैस्मिन वालियाला मुंबई इंडियन्सच्या टीमसोबतही पाहण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्या जवळीकीवर बरेच तर्कवितर्क लावले गेले. मात्र आता दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावरून अनफॉलो केल्याचं लक्षात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा जोर धरत आहेत. विशेष म्हणजे, हार्दिक पंड्या किंवा जैस्मिन वालियाने यापैकी कोणत्याही नात्याची अधिकृत घोषणा कधीच केली नव्हती, आणि आता ब्रेकअपबाबतही त्यांनी मौन बाळगलं आहे.
हे ही वाचा: बुमराह नाही तर 'हा' स्टार गोलंदाज चौथ्या कसोटीतून होणार OUT! टीम इंडियाचे प्लानिंग जाणून घ्या
News :-
— Jay Cricket. (@Jay_Cricket12) July 19, 2025
Rumours of a breakup between Hardik Pandya and British-Indian singer Jasmin Walia have emerged as the two have unfollowed each other on Instagram. pic.twitter.com/gkEsV8Uky3
याआधी हार्दिक पंड्याने 2020 साली नताशा स्टॅन्कोव्हिचसोबत लग्न केलं होतं. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात गुपचूप साखरपुडा केला आणि नंतर सोशल मीडियावर त्याची माहिती दिली होती. दोघांना एक मुलगा आहे ज्याचे नाव आगस्त्य असे आहे. मुलाच्या जन्मानंतर त्यांनी दोनदा लग्न केलं. एकदा हिंदू पद्धतीने आणि दुसऱ्यांदा ख्रिश्चन रीतिरिवाजांनुसार त्या दोघांनी लग्न केलं. मात्र गेल्या वर्षी हार्दिक आणि नताशा वेगळे झाले. टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हार्दिकने स्वतःही त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील या गोष्टींबद्दल कबुली दिली होती.
हे ही वाचा: विराट कोहली पुन्हा टेस्ट मैदानात उतरणार? निवृत्तीचा निर्णय मागे घेत टीम इंडियाच्या मदतीला येणार धाऊन?
नताशा स्टॅन्कोव्हिचनंतर नवीन नात्याने हार्दिकला सावरण्याची संधी दिली होती, पण ते नातंही काही महिन्यांतच संपल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हार्दिक पंड्या एकटाच राहिला आहे.