Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

टॉसला जाण्यापूर्वी हार्दिकने सूर्यासोबत खेळला लहानपणीचा खेळ, सर्व पाहातच राहिले Video Viral

IPL 2025  : पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात टॉसपूर्वी एक अनपेक्षित गोष्ट पाहायला मिळाली जी पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. 

टॉसला जाण्यापूर्वी हार्दिकने सूर्यासोबत खेळला लहानपणीचा खेळ, सर्व पाहातच राहिले Video Viral

IPL 2025 : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल 2025 चा 69 वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने विजयासाठी दिलेलं 185 धावांचं आव्हान पंजाब किंग्सने 7 विकेट राखून पूर्ण केलं. यासह पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबनं टॉप 2 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर आयपीएल 2025 च्या पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्सला चौथ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं. त्यांना मुंबईला आता फायनलमध्ये पोहोचण्यासाठी एलिमिनेटर सामना जिंकावा लागेल. पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात टॉसपूर्वी एक अनपेक्षित गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळाली जे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. 

टॉसपूर्वीच सांगितला प्लॅन : 

मुंबई विरुद्ध पंजाब सामन्यात टॉस करता मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या मैदानात येत होता. तर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर हा आधीच टॉसच्या ठिकाणी पोहोचला होता. हार्दिक टॉस करण्यापूर्वी थोडा विवंचनेत दिसत होता. म्हणून त्याने टॉस करण्यापूर्वी सूर्याला बोलावलं आणि लहानपणी दोनपैकी कोणताही एक निर्णय घेत असताना बोटं निवडण्याचा एक खेळ खेळला जायचा तसा खेळ हार्दिक आणि सूर्याने मुंबई टॉस जिंकली तर पहिले 'फलंदाजी की गोलंदाजी' निवडावी हे ठरवण्यासाठी खेळला.  त्यावेळी हार्दिकने सूर्याचे एक बोट निवडले आणि त्यावर सूर्याने सांगितले की, 'बॅट फर्स्ट...'. त्याचा अर्थ असा होता की जर मुंबई इडिअन्स टॉस जिंकली तर प्रथम फलंदाजीचा निर्णय घ्यावा. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

पंजाब किंग्सने मुंबईचा तोंडचा घास हिरावला : 

आयपीएल 2025 मध्ये सोमवारी 26 मे रोजी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. त्यामुळे मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागेल. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 7 विकेट गमावून 184 धावा केल्या. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

 पंजाब किंग्सने 18.3 मध्ये 187 धावा करून विजयाचं आव्हान पूर्ण केलं. यासह पंजाब किंग्सने पॉईंट्स टेंबलमध्ये गुजरातला मागे सारून पहिलं स्थान पटकावलं असून यामुळे त्यांचं प्लेऑफसाठीच टॉप २ मधील स्थान पक्कं झालं आहे. त्यामुळे पंजाबला क्वालिफायर १ सामना खेळले, यात ते पराभूत झाल्यास त्यांना फायनलमध्ये पोहोचण्यासाठी अजून एक संधी मिळेल. 

मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 : रियान रिकलटन, रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, नमन धीर, मिचेल सॅन्टनर, दीपक चहर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह

पंजाब किंग्सची प्लेईंग 11 : प्रियांश आर्या, जॉश इंग्लिस, श्रेयस अय्यर, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, मार्को यानसन, हरप्रीत ब्रार, काईल जेमिसन, विजय कुमार वैश्यक, अर्शदीप सिंग

Read More