Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

DIVORCED! ज्याची चर्चा होती तेच घडलं! हार्दिक-नताशाचा घटस्फोट... पांड्याची भावूक पोस्ट

Hardik Pandya Natasha Divorce: टीम इंडियाचा स्टार फलंदाज हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) यांनी घटस्फोट घेतला आहे. पांड्याने याची माहिती दिली.

DIVORCED! ज्याची चर्चा होती तेच घडलं! हार्दिक-नताशाचा घटस्फोट... पांड्याची भावूक पोस्ट

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा स्टार फलंदाज हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) यांच्यातील घटस्फोटाची चर्चा (Hardik Pandya announced divorce) सुरू होती. अशातच आता हार्दिक पांड्याने इन्टाग्राम पोस्ट करत घटस्फोटाच्या चर्चेवर शिक्कामोर्बत केलं. त्यावेळी हार्दिक पांड्याने चाहत्यांना एक विनंती देखील केली आहे.

काय म्हणाला Hardik Pandya ?

गेल्या 4 वर्षे एकत्र राहिल्यानंतर, नताशा आणि मी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकत्रितपणे आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले आणि आमचे सर्वकाही दिले आणि आम्हाला विश्वास आहे की हे आम्हा दोघांच्या हिताचे आहे. आम्ही एकत्र अनुभवत असलेला आनंद, परस्पर आदर आणि साहचर्य लक्षात घेऊन आणि आम्ही एक कुटुंब वाढवत असताना हा निर्णय घेणे आमच्यासाठी कठीण होते, असं हार्दिकने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

आम्ही अगस्त्याला आशीर्वादित आहोत, जो आमच्या दोन्ही जीवनाच्या केंद्रस्थानी राहील आणि त्याच्या आनंदासाठी आम्ही त्याला जे काही करू शकतो ते देऊ याची खात्री करण्यासाठी आम्ही सह-पालक राहू. या कठीण आणि संवेदनशील काळात आम्हाला गोपनीयता देण्यासाठी आम्ही तुमच्या समर्थनाची आणि समजून घेण्याची मनापासून विनंती करतो, अशी पोस्ट हार्दिक पांड्याने केली आहे.

IND vs SL : तेलही गेलं अन् तुपही गेलं! 'या' कारणामुळे बीसीसीआयने हार्दिक पांड्याला दिली नाही कॅप्टन्सी

दरम्यान, हार्दिकने 2020 मध्ये दुबईमध्ये नताशाला प्रपोज केलं होतं आणि 31 मे 2020 रोजी लॉकडाऊन दरम्यान दोघांनी लग्नगाठ बांधली होती. 30 जुलै 2020 रोजी नताशा आणि हार्दिकच्या आयुष्यात मुलगा अगस्त्या याचं आगमन झालं. परंतू गेल्या काही वर्षांपासून दोघांमधील मतभेद दिसून येत होते. अशातच आता त्यांनी घटस्फोट जाहीर केला आहे.

Read More