Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

हार्दिक पांड्या फिटनेस टेस्टमध्ये फेल, त्याच्या जागी या खेळाडुला संधी

हार्दिक पांड्या पुन्हा टीममध्ये येण्यासाठी करतोय प्रयत्न

हार्दिक पांड्या फिटनेस टेस्टमध्ये फेल, त्याच्या जागी या खेळाडुला संधी

मुंबई : टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) काही दिवसांपासून टीम इंडियामधून बाहेर आहे. टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यासाठी जाणार आहे. त्यासाठी टीम इंडिया ए मध्ये पांड्याची निवड ही झाली होती. पण शनिवारी मुंबईमध्ये झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये हार्दिक फेल झाला आहे. त्यामुळे आता त्याला इंडिया ए टीममध्ये ही जागा मिळाली नाही.

हार्दिकच्या जागी ऑलराउंडर विजय शंकरला टीममध्ये संधी मिळाली आहे. विजय न्यूझीलंडसाठी रवाना देखील झाला आहे. इंडिया ए आधी दोन वनडे सराव सामने खेळणार आहे. त्यानंतर मग तीन लिस्ट ए सामना आणि दोन ४ दिवसांचा टेस्ट सामना होणार आहे. पांड्या हा टीम इंडियामध्ये पुन्हा जागा मिळावी यासाठी प्रयत्न करतो आहे. त्यासाठी तो मेहनत देखील घेत आहे.

पांड्याने म्हटलं की, 'न्यूझीलंड दौऱ्याच्या दुसऱ्या भागापर्यंत फीट होण्याचा प्रयत्न करतो आहे. राष्ट्रीय निवडसमितीने त्याला इंडिया ए टीममध्ये निवडलं होतं. पण मी न्यूझीलंड सीरीजच्या आधी येईल. यानंतर आयपीएल आणि मग टी20 वर्ल्डकप सामने होणार असल्याने त्याआधी काही आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विचार आहे.'

Read More