Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

एली अवरामशी हार्दिक पांड्याचा ब्रेकअप? या अॅक्ट्रेसला करतोय करतोय डेट

टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पांड्या बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एली अवरामला डेट करत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. 

एली अवरामशी हार्दिक पांड्याचा ब्रेकअप? या अॅक्ट्रेसला करतोय करतोय डेट

मुंबई : टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पांड्या बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एली अवरामला डेट करत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र आता बातमी येतेय की पांड्या अवरामला सोडून बॉलीवूडची बोल्ड अॅक्ट्रेस उर्वशी रौतेलासोबत वेळ घालवतोय.  गेल्या काही दिवसांमध्ये हार्दिकसोबत एली अनेक कार्यक्रमांमध्ये दिसली होती. मात्र या लव्हस्टोरीत आता ट्विस्ट आलाय. 

काही दिवसांपूर्वीच एका बिझनेसमनच्या पार्टीत हार्दिक पांड्या पोहोचला होता. या पार्टीत उर्वशीही आली होती. या पार्टीत दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. या पार्टीत हार्दिकसोबत त्याचा भाऊही होता. मात्र हार्दिक आणि उर्वशी एकमेकांशी बराच वेळ बोलत होते. 

याआधी हार्दिक एलीसोबत बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसला होता. मात्र दोघांनी कधी रिलेशनशिपचा स्वीकार केला नाही. मात्र दोघांच्या अफेयरच्या चर्चा सुरु होत्या.

काही दिवसांपूर्वी मुंबईत हार्दिकने एलीसोबत अॅडही शूट केली होती. हार्दिकसोबच्या नात्याबाबत प्रश्न केला असताना एलीने कधीही नकार दिला होता. एका मुलाखतीत एलीने म्हटले होते की मी माझ्या पर्सनल लाईफबाबत बोलायचे नाहीये. 

Read More