India vs Australia semi final, Hardik Pandya New Girl Friend: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमी फायनल सामन्यात हार्दिक पंड्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. त्यानेऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 28 धावांची शानदार खेळी खेळली. तो बाद झाला तेव्हा भारत विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. या खेळीमध्ये त्याने106 मीटरचा लांब षटकार (Hardik Pandya 106 Meter Six) ठोकला जो पाहून विराट कोहली, प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासह संपूर्ण स्टेडियम आनंदित झाले. या षटकाराने संपूर्ण स्टेडियम नाचले आणि यादरम्यान स्टँडवर बसलेली त्याची तथाकथित गर्लफ्रेंड हिचाही आनंदही पाहण्यासारखा होता. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या प्रत्येक सामन्यात ती टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी येत आहे. एवढंच नाही तर जेव्हा हार्दिक बॅटिंग करतो तेव्हा तिचा आनंद वेगळाच असतो. यावरून दोघांमध्ये एक विशेष नाते आहे हे आणखी दृढ होते.
हार्दिक पांड्यानच्या जबरदस्त सिक्सरची तर चर्चा झालीच पण त्यासोबतच टीव्ही स्क्रीनवर अचानक दिसलेला एक चेहरा. या व्यक्तीने केलेले सेलिब्रेशनही दिसले. ती तरुणी हार्दिकची नवीन लेडी लव्ह आहे का? अशी चर्चा होत आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून जास्मिन वालिया (Jasmin Walia) होती. काही वेळेपासून जास्मिन वालिया ही हार्दिक पांड्याची तथाकथित गर्लफ्रेंड असल्याचे म्हटले जाते. जस्मिन वालिया भारताचे सगळे सामने बघायला दुबईतील स्टेडियममध्ये पोहोचली.
हे ही वाचा: S*x चेंज ऑपरेशन करुन मुलगी झालेला संजय बांगरचा मुलगा बाबर आझमशी करणार लग्न? जाणून घ्या सत्य
बाकीच्या खेळाडूंच्या कुटुंबीयांप्रमाणे जास्मिन वालिया देखील स्टेडियममध्ये उपस्थित होती. तिने पांड्याच्या या शॉटवर आनंदाने उड्या मारल्या. जस्मिन या संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाला सपोर्ट करताना दिसली. जेव्हाही हार्दिक पांड्या फलंदाजी करतो तेव्हा तिचा आनंद स्पष्टपणे दिसून येतो. तिचा हा आनंद तिच्या आणि पांड्यामधील एका खास नातेसंबंधाकडे लक्ष वेधतो. यावरून त्या दोघांचे चाहते त्यांच्याबद्दलअंदाज लावत आहेत.
Hardik Pandya hitting a six and the cameraman shows a picture of Jasmin Walia. pic.twitter.com/WshN2IAW9d
— Vipin Tiwari (@Vipintiwari952) March 4, 2025
हे ही वाचा: Video: हिटमॅनच्या मुलाला पहिले का? पहिली झलक झाली Viral, सामन्यादरम्यान अनुष्कासोबत दिसला खेळताना
४५व्या षटकात चार डॉट बॉल्सनंतर पंड्याने पाचव्या चेंडूवर १०६ मीटरचा जबरदस्त सिक्सर ठोकला. या सिक्सरने सामना केवळ भारताकडेच वळवला नाही, तर पांड्याच्या या शानदार शॉटने संपूर्ण स्टेडियम आनंदाने उसळले. या सिक्सरवर विराट कोहली आणि गौतम गंभीरसह सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.