Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पहिल्यांदाच हार्दिक पांड्याच्या मुलाचा फ्लाईट प्रवास

शेअर केला मुलाचा गोंडस फोटो 

पहिल्यांदाच हार्दिक पांड्याच्या मुलाचा फ्लाईट प्रवास

मुंबई : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. हार्दिक पांड्याने गुरूवारी एक फोटो शेअर केला होता. यामध्ये हार्दिकचा मुलगा अगस्त्यचा (Agastya) पहिला विमानी प्रवास केला आहे. हार्दिक आणि नताशाच्या चाहत्यांनी हा फोटो लाईक केला आहे. 

हार्दिक आणि नताशाने शेअर केला फोटो 

शुक्रवारी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ची पत्नी नताशा स्टॅनकोविच Natasa Stankovic) त्याच फ्लाइटचे फोटो शेअर केले आहे. यामध्ये अगस्त्य तिच्या मांडीवर बसून अतिशय आनंदी दिसत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

६ महिन्यांचा झाला अगस्त्य 

या सेलिब्रिटी कपलने ३० जुलै २०२० रोजी अगस्त्यचं या जगात स्वागत केलं. अगस्त्यचा जन्म गुजरातमध्ये आणंद जिल्ह्यातील आकांक्षा रुग्णालयात झाला. हार्दिकने २०२० मध्ये नताशाला प्रपोझ करून दुबईत साखरपुडा केला.

काही दिवसांपूर्वी वडिलांना गमावलं 

 हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झालं. त्यामुळे पांड्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर केसाळला. जेव्हा हार्दिक पांड्याच्या मोठ्या भावाला वडिलांचे निधन झाल्याची बातमी कळाली तेव्हा क्षणाचाही विलंब न करता बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय त्याने घेतला . यानंतर तो मुश्ताक अली स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. दरम्यान वडिलांच्या निधनानंतर हार्दिक पांड्यानी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

वडिलांसोबत फोटो शेअर करत तो म्हणाला, 'तुम्हाला आम्ही गमावलं आहे. ही गो्ष्ट आम्ही आयुष्यात कधीही स्वीकारू शकत नाही. पण तुम्ही आमच्यासाठी गोड आठवणी ठेवून गेलात. आज तुमची मुलं जे काही मिळवू शकली आहेत, ते फक्त तुमच्यामुळे.'

Read More