Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

हर्षल पटेल-रियान परागमध्ये वाद पेटला, मॅच संपताच नेमकं काय घडलं पाहा VIDEO

एवढा Aittide बरा नव्हे! हर्षल पटेल-रियानमध्ये नेमकं काय बिनसलं पाहा व्हिडीओ 

हर्षल पटेल-रियान परागमध्ये वाद पेटला, मॅच संपताच नेमकं काय घडलं पाहा VIDEO

मुंबई : बंगळुरू विरुद्ध राजस्थान सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सामना हरल्याचं दु:ख आणि राग एवढा होता की दोन खेळाडू भिडल्याचं पाहायला मिळालं. बंगळुरूचा राजस्थानने 29 धावांनी पराभव केला. या सामन्यात हर्षल पटेल आणि रियान पराग यांच्यातील वाद पेटल्याचं पाहायला मिळालं.

हर्षल आणि रियान एकमेकांचे शत्रू असल्यासारखं वागत होते. मॅच संपल्यानंतर हर्षल पटेल आणि रियान यांच्यात वाद झाला. या वादानंतर आता अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. 

मॅच संपल्यानंतर बॅट्समन विरुद्ध टीमच्या खेळाडूंना प्रोत्साहन देत उत्तम खेळल्याचं सांगतात. मात्र हर्षल पटेलने रियानसोबत हात मिळवला नाही. हर्षल पटेलनं सरळ इग्नोर केलं आणि पुढे निघून गेला. त्यामुळे रियान आणि हर्षलमध्ये पुन्हा वाद पेटल्याचं पाहायला मिळालं आहे.

बंगळुरू विरुद्ध राजस्थान मॅचमध्ये हर्षल पटेल आणि रियान भिडल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. राजस्थानच्या शेवटच्या ओव्हरमध्ये हर्षल पटेल बॉलिंग करत होता. 

रियानने हर्षल पटेलची धुलाई केली. त्याने 31 बॉलमध्ये 56 धावा केल्या. रियान सामन्या संपल्यानंतर डगआऊटकडे जाताना हर्षलने त्याला डिवचलं आणि तिथे वाद सुरू झाला. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हर्षल पटेल आणि रियान यांच्यात झालेल्या वादाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. बंगळुरूला सामना गमवण्याची वेळ आली. तर बंगळुरूकडून कोहली पुन्हा फ्लॉपच ठरल्याचं पाहायला मिळालं. राजस्थानच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी दमदार कामगिरी करून सामना जिंकला. बंगळुरूवर 29 धावांनी विजय मिळवला. 

Read More