दिल्ली : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने T20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निराशाजनक कामगिरी केली होती. याबद्दल आता त्याने माफी मागितली आहे. सर्वांपेक्षा आपण अधिक निराश असल्याचं सांगत त्याने कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून सावरल्यानंतर पुन्हा मजबूत पुनरागमन करण्याचं आश्वासन दिलंय.
हसन अलीने गुरुवारी दुबईत 19व्या षटकात मॅथ्यू वेडचा कॅच सोडला आणि त्याची चूक टीमला महागात पडली. यानंतर ऑस्ट्रेलियन विकेटकीपर वेडने सलग तीन सिक्स मारत टीमला पाच गडी राखून विजय मिळवून दिला.
वर्ल्डकप स्पर्धेतील पाकिस्तानची मोहिमही संपुष्टात आली. बाबर आझमच्या टीमने ग्रुप स्टेजमध्ये सलग पाच सामने जिंकून सेमीफायनलमध्ये फेरीत धडक मारली.
میرا سینہ تیری حُرمت کا ہے سنگین حصار،
— Hassan Ali (@RealHa55an) November 13, 2021
میرے محبوب وطن تُجھ پہ اگر جاں ہو نثار
میں یہ سمجھوں گا ٹھکانے لگا سرمایہِ تن،
اے میرے پیارے وطن pic.twitter.com/4xiTS0hAvx
हसनने ट्विट केलं की, 'माझी कामगिरी तुमच्या अपेक्षेप्रमाणे न झाल्याने तुम्ही सर्व निराश आहात हे मला माहीत आहे. पण तुम्ही माझ्यामुळे अधिक निराश होऊ नका. माझ्याबद्दलच्या तुमच्या अपेक्षा बदलू नका. मला पाकिस्तान क्रिकेटची सेवा करायची आहे, म्हणून मी पुन्हा मेहनत करायला सुरुवात केलीये"
यावरून हसनने ट्विट करत सर्व चाहत्यांची माफी मागितली आहे. हसन म्हणाला, 'हा टप्पा मला अधिक कणखर होण्यास मदत करेल. सर्व मेसेज, ट्विट, पोस्ट, कॉल आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. ते सध्या आवश्यक आहेत.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यानंतर हसनला सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि नकारात्मकतेचा सामना करावा लागला.