मुंबई : बॉलरच्या दमदार कामगिरीच्या जोरावर आणि फखर जमान याच्या शतकीय खेळीमुळे पाकिस्तानचा विजय झाला. पाकिस्तानच्या क्वींस स्पोटर्स क्लब मैदानावर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने झिम्बॉब्वेचा 9 विकेटने पराभव केला. यासोबतच पाकिस्तानने 5 वनडे सामन्यांच्या सिरीजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली. झिम्बॉब्वेने 48.2 ओव्हरमध्ये 194 रन केले. पाकिस्तानने 36 ओव्हरमध्ये हा सामना जिंकला. पाकिस्तानचा फास्ट बॉलर हसन अली सध्या जबरदस्त परफॉर्मेंस करत आहे. पण या सामन्यात विकेट घेतल्यानंतर त्याचा आनंद साजरा करणं त्याला महागात पडलं.
Hasin Ali's celebration goes wrong. #ZIMvPAK pic.twitter.com/IQ57HqYg9e
— Sai Kishore (@KSKishore537) July 16, 2018
हसन अलीचा मैदानावर विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशनचा अंदाज काही वेगळा आहे. त्याच्या या अंदाजाला बॉम्ब एक्सप्लोजनच्या नावाने ओळखलं जाते. या सामन्यात हसन अलीने 3 विकेट घेतले. पण यावेळी सेलिब्रेशन करणं त्याला भारी पडलं आहे.
Hassan Ali Jani Wtf
— Arslan Ahmad (@IamArsal10) July 16, 2018
Imao! pic.twitter.com/xkuzEJkh2T
हसन अलीने बॅट्समनला बोल्ड केल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या अंदाजात सेलिब्रेशन केलं. पण या दरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली.