Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

हसीनने पुन्हा शेअर केले शमीचे व्हॉट्सअॅप चॅट...

भारतीय क्रिकेट संघाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

हसीनने पुन्हा शेअर केले शमीचे व्हॉट्सअॅप चॅट...

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याची पत्नी हसीन जहॉने शमीवर अनैतिक संबंध, मारहाण, हत्येचा प्रयत्न, मॅच फिक्सिंग यांसारखे गंभीर आरोप केले आहेत. हे सर्व आरोप शमीने फेटावून लावले असेल तरी दिवसेंदिवस या प्रकरणाबद्दल नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस वादाला नवे वळण लागत आहे.आता समोर आलेली ताजी माहिती म्हणजे हसीन जहॉने शमीचे नवीन व्हॉट्सअॅप चॅट आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. या स्क्रीनशॉटमध्ये दिसते की, शमी आकांक्षा नावाच्या एका मुलीशी चॅट करत आहे. यापूर्वीही हसीनने अशाप्रकारचे स्क्रीनशॉट याच अकाऊंटवरुन शेअर केले होते. पण ते आता दिसत नाहीत कारण ते पोस्ट केल्यानंतर लगेचच हटवण्यात आले होते. आता ही नवी पोस्ट हसीनने २० मार्चला केली आहे.


आता हे प्रकरण कोणते वळण घेतं ते पाहावं लागेल. 

शमी दुबईत एका पाकिस्तानी मुलीला भेटून तिच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप हसीनने केला होता. आणि बीबीसीआयच्या रिपोर्टनुसार, शमी १७-१८ फेब्रुवारीला दुबईत असल्याची माहिती कोलकत्ता पोलिसांनी दिली आहे. पण त्याचे काही वैयक्तिक काम असल्याचे त्याबद्दलची माहिती बीबीसीआयकडे उपलब्ध नाही.

ममता बनर्जींची भेट घेणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी या हसीन जहॉला भेटण्यास तयार आहेत. हसीनही तशा प्रयत्नात गेल्या काही दिवसांपासून होती. पण अखेर २३ मार्चला हसीन ममता बनर्जींची भेट घेणार आहे.

Read More