Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

गौतम गंभीर पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर जाणार की नाही? BCCI कडून समोर आली महत्वाची माहिती

IND VS ENG Test : शुक्रवार 20 जून पासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिला टेस्ट सामना खेळवला जाणार आहे. तेव्हा यासाठी गौतम गंभीर (Gautam Gambhir) पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर परतणार की नाही यावर चर्चा सुरु असताना बीसीसीआयच्या सूत्रांकडून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 

गौतम गंभीर पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर जाणार की नाही? BCCI कडून समोर आली महत्वाची माहिती

IND VS ENG Test :  भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवण्यात येणार आहे. यासाठी टीम इंडियाचा संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफ इंग्लंडला गेला असून तेथे 20 जून पासून टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर हा कुटुंबात आलेल्या एका वैद्यकीय इमर्जन्सीमुळे तडकाफडकी भारतात परतला. शुक्रवार 20 जून पासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिला टेस्ट सामना खेळवला जाणार आहे. तेव्हा यासाठी गौतम गंभीर (Gautam Gambhir) पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर परतणार की नाही यावर चर्चा सुरु असताना बीसीसीआयच्या सूत्रांकडून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 

भारतीय पुरुष संघाचा हेड कोच गौतम गंभीर हा 13 जून रोजी इंग्लंडहून भारतात परतला. गंभीरच्या आईला हार्ट अटॅक आल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. इंग्लंड दौऱ्यातील पहिला सामना जवळ येत असला तरी हेड कोच गौतम गंभीर पुन्हा इंग्लंडला कधी परतणार याबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती, त्यामुळे व्ही व्ही एस लक्ष्मण हा इंग्लंड दौऱ्यात गंभीरची जागा घेऊ शकतो अशी सुद्धा चर्चा होती. मात्र बीसीसीआयच्या सूत्रांकडून आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, 'गंभीरच्या आईच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा झाली असून तो उद्या म्हणजे मंगळवारी इंग्लंडला रवाना होणार होईल'. 

हेही वाचा : कुलदीप यादवने इंस्टाग्रामवरून होणाऱ्या पत्नीचे फोटो केले डिलीट, 12 दिवसांपूर्वी झाला होता साखरपुडा

 

गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच झाल्यापासून भारताला आतापर्यंत एकही टेस्ट सीरिज जिंकण्यात यश आलं नाहीये. 2024 मध्ये गौतम गंभीरची हेड कोच पदावर नियुक्ती झाल्यापासून भारताने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध टेस्ट सीरिज खेळल्या, मात्र दोन्हीमध्ये भारताचा दारुण पराभव झाला, ज्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये क्वालिफाय करण्याची नामी संधी सुद्धा भारताने गमावली. त्यामुळे आगामी इंग्लंड दौरा हा भारतासाठी कसा ठरतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिज वेळापत्रक : 

भारत विरुद्ध इंग्लंड पहिला सामना : 20 ते 24 जून 
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा सामना  : 2 ते 6 जुलै 
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा सामना  : 10 ते 14 जुलै 
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा सामना  :  23 ते 27 जुलै 
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना : 31 जुलै ते 4 ऑगस्ट 

Read More