Heated Exchange Between Yashasvi Jaiswal-Ben Stokes: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत मैदानात तापमान अचानक वाढलेले दिसले. याचे कारण यावेळी तो हवामानामुळे नव्हे, तर यशस्वी जयस्वाल आणि इंग्लंड कर्णधार बेन स्टोक्समधील शाब्दिक बाचाबाची हे आहे. एजबॅस्टनच्या मैदानावर पहिल्या दिवशी दोघांमध्ये रंगलेली ही भिडंत सध्या चर्चेचा विषय ठरली आहे आणि त्याचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
सामन्याच्या पहिल्या सत्रात जयस्वाल आणि स्टोक्स यांच्यात काहीसं तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. दोघेही काहीसे आक्रमक दिसले आणि काही क्षणांकरता आता काय होईल अशी परस्थिती दिसून आले. स्टोक्स हा आधीपासूनच त्याच्या थेट भिडणाऱ्या स्वभावासाठी ओळखले जातो त्यामुळे त्यांच्याकडून अशी प्रतिक्रिया अपेक्षित असतेच. मात्र, जयस्वालचा संयम राखत दिलेला प्रतिसादही चाहत्यांच्या नजरेत भरला. या शाब्दिक खडाजंगीचा नक्की विषय काय होता, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र सोशल मीडियावर या प्रसंगाचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा: IND vs ENG 2nd Test: जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटीत का खेळत नाहीये? कर्णधार शुभमन गिलने स्पष्ट केलं कारण
Words exchange between Ben Stokes & Yashasvi Jaiswal in 2nd Test at Edgbaston.!!! pic.twitter.com/OTEc9S1Q57
— MANU. (@IMManu_18) July 2, 2025
हे ही वाचा: वेस्टइंडीज क्रिकेटरवर 11 महिलांच्या बलात्काराचा आरोप; मुख्य प्रशिक्षक म्हणाले, ' मी जज नाही. पण...'
एजबॅस्टन येथे टॉस जिंकून इंग्लंडच्या कर्णधाराने भारताला पहिले फलंदाजीस पाचारण केलं. स्टोक्सने स्पष्ट सांगितलं की, 'ओव्हरहेड कंडिशन्स' म्हणजे ढगाळ वातावरण लक्षात घेऊन त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
या बातमीच्या प्रकाशित वेळी भारताची धावसंख्या 77/1 अशी होती. के. एल. राहुल लवकर बाद झाल्यानंतर, यशस्वी जयस्वाल आणि करुण नायर यांनी डाव सावरत उत्तम भागीदारी केली. जयस्वाल 45 धावांवर तर नायर 29 धावांवर खेळत होते.