Jannik Sinner vs Carlos Alcaraz, French Open 2025 Final : रोलां गर्रोच्या मातीवर पुन्हा एकदा स्पेनचा झेंडा फडकला आहे. केवळ 22 वर्षांचा कार्लोस अल्काराजने टेनिसच्या इतिहासात आपलं नाव अजरामर केलं आहे. फ्रेंच ओपन 2025 च्या जबरदस्त अंतिम सामन्यात अल्काराजने सध्याचा जागतिक क्रमवारीतील नंबर-1 खेळाडू जॅनिक सिनरचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा ही प्रतिष्ठेची ट्रॉफी जिंकली. तब्बल पाच तास 29 मिनिटे चाललेला हा सामना फ्रेंच ओपनच्या इतिहासातील सर्वाधिक लांबलेला फायनल ठरला.
सामन्याची सुरुवात सिनरसाठी दमदार ठरली. पहिल्या सेटमध्ये त्याने 6-4 ने बाजी मारली. दुसऱ्या सेटमध्ये दोघांमध्ये खूप फेस टू फेस स्पर्धा बघायला मिळाला. हा सेट टायब्रेकरपर्यंत गेला आणि तिथेही सिनरने 7-4 ने वर्चस्व राखत दुसरा सेट आपल्या नावावर केला. सगळी गुणसंख्या बघून अनेकांना वाटलं की अल्काराजचा दुसरा सलग फ्रेंच ओपन खिताब अपूर्ण राहणार. पण तसे घडले नाही.
दोन सेट गमावल्यावर अल्काराजने दमदार पुनरागमन करत तिसरा सेट 6-4 ने जिंकला. चौथ्या सेटमध्ये एकवेळ तो पराभवाच्या टोकावर उभा होता, पण त्याने तीन मॅच पॉइंट वाचवत टायब्रेकरमध्ये 7-6 ने बाजी मारली आणि सामना निर्णायक सेटमध्ये गेला.
Alcaraz celebrated his win with the ball boys. Great gesture .#frenchopen2025#RolandGarros#alcarazsinnerpic.twitter.com/9CPtqH7VvU
— Dhiraj (@Xninjasocialite) June 8, 2025
पाचवा सेट अत्यंत चुरशीचा ठरला. दोघांनीही प्रत्येक पॉइंटसाठी खूप विचारपूर्वक खेळ केला. हा सेट सुपर टायब्रेकरपर्यंत गेला. अल्काराजने 10-2 असा सामना आपल्या नावावर केला. शेवटी त्याने 4-6, 6-7 (4-7), 6-4, 7-6 (7-3), 7-6 (10-2) अशा पद्धतीने फ्रेंच ओपन 2025 ची विजेतेपद पटकावलं.
ही लढत फ्रेंच ओपनच्या इतिहासातील सर्वात लांब चाललेली फायनल ठरली. संपूर्ण सामना 5 तास 29 मिनिटं चालला, ज्याने याआधीचे सर्व विक्रम मोडीत काढले.
Unbelievable
— The Sports Feed (@thesports_feed) June 8, 2025
Drop shot #RolandGarros #Alcaraz #FrenchOpen #RolandGarros2025 #frenchopen2025#RolandGarros25pic.twitter.com/BapsIlFHP4
या विजयासह अल्काराजच्या नावावर आता 5 ग्रँड स्लॅम विजेतेपदं जमा झाली आहेत.