मुंबई : इंडियन्ससाठी यंदाच्या आयपीएलच्या सिझनची सुरुवात काही फारशी चांगली झालेली नाही. मुंबई इंडियन्सला 15 व्या सिझनमध्ये सलग दोन पराभवांना सामोरं जावं लागलंय. अशातच मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची कामगिरी देखील फारशी चांगली झालेली नाही. दोन सामन्यांमध्ये रोहित शर्मा पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. दरम्यान यानंतर हॉटस्टारने रोहितबाबत ट्विट केलं असून यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.
राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्मा अवघ्या 10 रन्सवर माघारी परतला. रोहित आऊट झाल्याने ट्विटवर चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. यानंतर हॉटस्टारही मागे न राहता त्यांनीही रोहितला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. हॉटस्टारकडून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये 'No-hit Sharma।' असं लिहिलं होतं.
मात्र या ट्विटनंतर रोहितचे चाहते संतापले आणि त्यांनी हॉटस्टारला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यावेळी एका युजरने लिहिलं की, हॉटस्टार आता 4 सब्सक्रायबरला मिस करणार आहे, कारण मी हॉटस्टार अनसब्सक्राइब करतोय. तर दुसऱ्या एका युझरने हॉटस्टारला विराट कोहलीचा पीआर असं संबोधलं आहे.
Spreading hate?
— (@im_dheeru_) April 2, 2022
New PR of Kohli..
— vipul_45 (@Vipull45) April 2, 2022
Well paid Kohli Saab
राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 23 धावांनी विजय मिळवला आहे. राजस्थान या मोसमातील हा दुसरा विजय ठरला आहे. राजस्थानने मुंबईला विजयासाठी 194 धावांचं आव्हान दिले होते. मात्र मुंबईला दिल्लीच्या भेदक माऱ्यासमोर 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 170 धावाच करता आल्या.