Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Hardik Pandya: हार्दिक पंड्या इतरांसोबत ड्रेसिंग रूममध्ये कसा वागतो? टीममधील खेळाडूचा मोठा खुलासा

Hardik Pandya: हार्दिक पांड्या ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंसोबत कसा वागतो? यावर मुंबई इंडियन्सचा खेळाडू टीम डेव्हिडने एक वक्तव्य केलं आहे.

Hardik Pandya: हार्दिक पंड्या इतरांसोबत ड्रेसिंग रूममध्ये कसा वागतो? टीममधील खेळाडूचा मोठा खुलासा

Hardik Pandya: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आजकाल अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसतायत. यंदाचा सिझन सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने रोहित शर्माला डावलून हार्दिक पंड्याकडे टीमची धुरा सोपवण्यात आली आहे. यामुळे रोहित शर्माचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. अशातच टीममधील खेळाडू हार्दिकला एकटं पाडत असल्याचाही व्हिडीओ समोर आला होता. यावेळी हार्दिक पंड्या ड्रेसिंग रूममध्ये कसा वागतो याबाबत आता खुलासा झाला आहे. 

हार्दिक पांड्या ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंसोबत कसा वागतो? यावर मुंबई इंडियन्सचा खेळाडू टीम डेव्हिडने एक वक्तव्य केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम डेव्हिडने सांगितलं की, हार्दिक पांड्या टीमसाठी महत्त्वाची भूमिका बजावतोय. जेव्हा आम्ही दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध संघर्ष करत होतो, तेव्हा हार्दिक पांड्याने डावाची धुरा सांभाळली, त्यानंतर रोमॅरियो शेफर्डने चांगला खेळ केला.

टीम डेव्हिड म्हणाला की, हार्दिक पांड्या मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आऊट झाला. क्रिकेटमध्ये असं घडत असतं. मात्र हार्दिक पांड्यामुळे जे काही काम होतं ते त्याने ते केलं होतं. हार्दिकने संपूर्ण टीमला 'गम' प्रमाणे एकत्र ठेवलंय. त्यामुळे आम्ही शेवटच्या ओव्हर्समध्ये फायदा घेऊ शकलो. 

टीमच्या म्हणण्यानुसार, हार्दिक पांड्या टीममधील खेळाडूंना सोबत घेऊन जातोय. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याने संपूर्ण संघाला एकसंध ठेवलंय. 

रोहित शर्मा मुंबई संघ सोडणार?

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जचा माजी खेळाडू अंबाती रायडूने यासंदर्भात मोठं विधान केलं आहे. मुंबईत संघात जे झालं ते पाहता रोहित शर्मा जे चांगले वागणूक देतील अशा फ्रँचाईजीची निवड करेल असं परखड मत अंबाती रायडूने व्यक्त केलं आहे. 

अंबाती रायडूने म्हटलं की, "यासंदर्भात शेवटी रोहितच निर्णय घेईल. त्याची इच्छा असेल त्या टीममध्ये तो जाईल. प्रत्येक संघाला तो आपल्याकडे यावा आणि संघाचं नेतृत्व करावं असं वाटत असेल. रोहितच काय तो निर्णय घेईल. मला खात्री आहे की, इथे जे झालं हे ते पाहता जी फ्रँचाईजी चांगली वागणूक देईल अशी संघाची रोहित शर्मा निवड करेल".

Read More