Royal Challengers Bengaluru beat Punjab Kings: आयपीएल 2025 (IPL ) च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पंजाब किंग्ज इलेव्हनला दारुण पराभव पत्करावा लागला. यासह पंजाब किंग्सच्या सहमालकीण प्रीती झिंटाला IPL 2025 च्या फायनलमध्ये हार स्वीकारावी लागली असली, तरी आर्थिक बाजूने ती मोठी विजेती ठरली आहे. प्रीती झिंटाने १० पट जास्त कमाई केली. तिच्या 35 कोटींच्या गुंतवणुकीचे आज 350 कोटी झाले आहेत. हे सर्व ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण यामागील यशामागचं गणित काय आहे हे जाणून घेऊयात....
2008 साली जेव्हा IPL ची सुरुवात झाली, तेव्हा प्रीती झिंटाने पंजाब किंग्स संघात 35 कोटी रुपये गुंतवून सुमारे 23 टक्के हिस्सेदारी घेतली होती. काही वेळानंतर या टीमची आर्थिकदृष्ट्या खूप चांगली ग्रोथ झाली. याचमुळे प्रीतीच्या आज त्या हिस्सेदारीची किंमत जवळपास 350 कोटी रुपये झाली आहे.
हे ही वाचा : " त्याच्या शरीराचे तुकडे..." चेंगराचेंगरीत मृत पावलेल्या मुलाच्या बापाने फोडला टाहो
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, पंजाब किंग्सची एकूण बाजारमूल्य 2022 मध्ये 925 मिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली होती. या मूल्यानुसार, प्रीती झिंटाच्या 23% भागीदारीचे मूल्य सुमारे 350 कोटी रुपये इतके झाले आहे. म्हणजे तिने केलेल्या मूळ गुंतवणुकीच्या दहा पट फायदा आज तिला झाला आहे.
प्रीती झिंटाने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण तिने केवळ मोठ्या पडद्यावरच नव्हे, तर व्यवसायातही यश मिळवले आहे. तिच्याकडे स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे. ती ब्रँड एंडोर्समेंटसाठी 2 कोटींपर्यंत फी घेते आणि रिअल इस्टेटमध्येही तिचं मोठं इन्व्हेस्टमेंट आहे.
2016 मध्ये जीन गुडइनफशी लग्न करून ती अमेरिकेला गेली. सध्या ती अमेरिकेतील बेव्हर्ली हिल्स येथील घरात आपल्या दोन मुलांसह राहते. मुंबईच्या पाली हिलमध्ये तिचा 17 कोटींचा फ्लॅट आहे, तर शिमल्यातही तिचं करोडोंचं घर आहे. मर्सिडीज, बीएमडब्ल्यूसारख्या लक्झरी गाड्यांचं कलेक्शनही तिच्याकडे आहे.