Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Valentine Day : शिखर धवनची रोमँटिक लव्हस्टोरी

  दक्षिण आफ्रिके विरूध्दच्या वन डे सिरीजमध्ये विजय मिळवून देण्यात शिखर धवनचा मोठा वाटा आहे. 

Valentine Day : शिखर धवनची रोमँटिक लव्हस्टोरी

मुंबई:  दक्षिण आफ्रिके विरूध्दच्या वन डे सिरीजमध्ये विजय मिळवून देण्यात शिखर धवनचा मोठा वाटा आहे. 

तब्बल 26 वर्षानंतर भारतीय संघाचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. धवनने या सामन्यात आपले 100 वे शतक पूर्ण करून चाहत्यांना आनंद दिला. टीम इंडियाचा फलंदाज शिखर धवन उत्तम खेळाडू आहे. त्याच्या खेळाचं सगळीकडून कौतुक केलं जात आहे. त्याने नेहमीच टीम इंडियाला विजयाच्या दारात आणून ठेवले तर अनेकदा विजयात मोठं योगदान दिलं. शिखर धवनचा टीम इंडियातील प्रवास जसा खूपच रोमांचक आहे, तशी त्याची लव्हस्टोरीही खूप रोमांचक आहे.

fallbacks

शिखरची रोमँटिक लव्हस्टोरी 

ऑस्ट्रेलियातील एका भारतीय वंशाच्या तरुणीशी त्याने लग्न केलं. खरंतर या दोघांची ओळख फेसबुकवरून झाली. पाहता पाहता दोघांचं प्रेम जुळलं आणि पाहता पाहता दोघांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतली. महत्वाची गोष्ट म्हणजे शिखरची पत्नी ही बॉक्सर आहे. या दोघांची लव्हस्टोरी ही एखाद्या सिनेमाच्या कथानकाला शोभावी असीच आहे.

कोण आहे शिखरची पत्नी

आयेशा मुखर्जी असं शिखरच्या पत्नीचं नाव असून या तरुणीचा फोटो त्याने सर्वात अगोदर हरभजन सिंहकडून पाहायला मिळाला. तिला पाहताच शिखरच्या मनात ती भरली. त्यानंतर शिखर धवनने आयेशा मुखर्जीला फेसबुक रिक्वेस्ट पाठवली आणि आयेशानेही रिक्वेस्ट स्वीकारली. 

फेसबुकवर हळूहळू दोघांमध्ये बोलणं होऊ लागलं. असच बोलता बोलता दोघेही ऎकमेकांच्या प्रेमात कधी पडले त्यांनाही कळले नाही. ऑस्ट्रेलियात जन्म घेतलेल्या आयेशाची आई ऑस्ट्रेलियन आहे, तर वडिल पश्चिम बंगालचे आहेत. भारतात पहिल्यांदा शिखरची भेट झाल्यानंतर आपल्याला बंगाली चांगली बोलता येते, असं आयेशाने सांगितलं होतं.

fallbacks

दोघांच्या वयात आहे एवढं अंतर 

आयेशा आणि शिखरच्या वयात तब्बल दहा वर्षांचं अंतर आहे. अगोदरच्या पतीपासून आयेशाला दोन मुली आहेत. त्यांचाही स्वीकार शिखरने केला. आयेशाचं पहिलं लग्न झालेलं असल्याने शिखरच्या कुटुंबीयांचा लग्नाला जोरदार विरोध होता. मात्र शिखरच्या आईचा पाठिंबा असल्याने कुटुंबीयांचा विरोध फार काळ टिकला नाही.

शिखर आणि आयेशाने 2009 साली साखरपुडा केला. मात्र शिखरला भारतीय संघात स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं. खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी शिखरने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आयेशा आणि शिखर 2012 साली विवाह बंधनात अडकले. 2012 साली लग्न झाल्यानतंर आयेशाने 2014 साली मुलाला जन्म दिला. आयेशा शिखरच्या अनेक सामन्यांनाही उपस्थित असते. मात्र आयेशाला ऑस्ट्रेलिया ते भारत आणि भारत ते ऑस्ट्रेलिया असा प्रवास आजही करावा लागतो.

Read More