Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'माझ्या सोबत तीन कॅप्टन...' IPL 2025 पूर्वी रोहित, सूर्या आणि बुमराहबाबत काय म्हणाला हार्दिक पंड्या?

आयपीएल सुरु होण्यासाठी काहीच दिवस असताना मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि हेड कोच महेला जयवर्धने यांनी पत्रकार परिषद घेतली. यात हार्दिक रोहित, सूर्या आणि बुमराहबाबत व्यक्त झाला. 

'माझ्या सोबत तीन कॅप्टन...' IPL 2025 पूर्वी रोहित, सूर्या आणि बुमराहबाबत काय म्हणाला हार्दिक पंड्या?

IPL 2025 : जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनला 22 मार्च पासून सुरुवात होणार आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) 23 मार्च रोजी नव्या सीजनमधील पहिला सामना खेळणार आहे. चिन्नस्वामी स्टेडियमवर मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात सामना रंगणार असून दोन्ही संघाचे खेळाडू नव्या सीजनची सुरुवात विजयाने करण्यासाठी सर्वच्या मैदानात घाम गाळत आहेत. आयपीएल सुरु होण्यासाठी काहीच दिवस असताना मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि हेड कोच महेला जयवर्धने यांनी पत्रकार परिषद घेतली. यात हार्दिक रोहित, सूर्या आणि बुमराहबाबत व्यक्त झाला. 

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत आयपीएल विजेतेपदाच्या 5 ट्रॉफी जिंकल्या आहेत. आयपीएल 2024 पूर्वी मुंबईने रोहित शर्माला कर्णधार पदावरून बाजूला करत गुजरात टायटन्सकडून ट्रेड करून घेतलेल्या हार्दिक पंड्याला संघाचं कर्णधार बनवलं. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ मागील सीजनमध्ये चांगलं परफॉर्म करू शकला नाही आणि त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये संघ शेवटच्या स्थानावर राहिला. मात्र यंदा सुद्धा मुंबईने हार्दिक पंड्यालाच कर्णधार पदाची जबाबदारी दिली आहे. तेव्हा यंदा त्याच्या नेतृत्वात संघ कसा परफॉर्म करतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 

हेही वाचा : IPL 2025 साठी बीसीसीआयचे 10 विचित्र नियम, ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य, नियम न पाळल्यास होणार कारवाई

आयपीएल 2025 पूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि हेड कोच महेला जयवर्धने यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत हार्दिकने विविध प्रश्नांची उत्तर दिली. मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात होणाऱ्या पहिल्या सामन्यात हार्दिक पंड्यावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई असल्याने सूर्यकुमार यादव हा त्या सामन्यासाठी मुंबईचं कर्णधारपद सांभाळणार आहे. यावेळी हार्दिक बोलताना म्हटला, 'मी खूप भाग्यवान आहे की माझ्यासोबत संघात तीन कॅप्टन खेळतायत. रोहित, सूर्यकुमार यादव आणि बुमराह, त्यांचा हात नेहमीच माझ्या कांद्यावर असेल'. 

मुंबईचे सामने कधी आणि कोणाविरुद्ध?

1) चेन्नई सुपर किंग्ज - 23 मार्च, रविवार (चेन्नई)

2) गुजरात टायटन्स - 29 मार्च, शनिवार (अहमदाबाद)

3) कोलकाता नाईट रायडर्स - 31 मार्च, सोमवार (वानखेडे, मुंबई)

4) लखनऊ सुपर जायंट्स - 4 एप्रिल, शुक्रवार (लखनऊ)

5) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - 7 एप्रिल, सोमवार (वानखेडे, मुंबई)

6) दिल्ली कॅपिटल्स - 13 एप्रिल, रविवार (दिल्ली)

7) सनरायझर्स हैदराबाद - 17 एप्रिल, गुरुवार (वानखेडे, मुंबई)

8) चेन्नई सुपर किंग्ज - 20 एप्रिल, रविवार (वानखेडे, मुंबई)

9) सनरायझर्स हैदराबाद - 23 एप्रिल, बुधवार (हैदराबाद)

10) लखनऊ सुपर जायंट्स - 27 एप्रिल, रविवार (वानखेडे, मुंबई)

11) राजस्थान रॉयल्स - 1 मे, गुरुवार (जयपूर)

12) गुजरात टायटन्स - 6 मे, मंगळवार (वानखेडे, मुंबई)

13) पंजाब किंग्ज - 11 मे, रविवार (धरमशाला)

14) दिल्ली कॅपिटल्स - 15 मे, गुरुवार (वानखेडे, मुंबई)

Read More