Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

मला हसीन जहासोबतच रहायचं आहे - मोहम्मद शमी

पत्नी हसीन जहा कडून गंभीर आरोप केल्यानंतर फास्ट बॉलर मोहम्मद शमीने मीडियाशी संवाद साधला. 

 मला हसीन जहासोबतच रहायचं आहे - मोहम्मद शमी

मुंबई : पत्नी हसीन जहा कडून गंभीर आरोप केल्यानंतर फास्ट बॉलर मोहम्मद शमीने मीडियाशी संवाद साधला. 

आपल्यावर लावलेले गंभीर आरोप निराधार असल्याचे त्याने स्पष्ट केले. माझा खेळ खराब करण्याकरता हे कुणीतरी षडयंत्र केलं असल्याचं शमीने म्हटलं आहे. या प्रकरणात मला गोवल जात आहे. 

शमी हा उत्तर प्रदेशच्या अमरोहा जनपदच्या सहसपुर अलीनगर गावचा रहिवाशी आहे. मोहम्मद शमीवर मारहाणी आणि दुसऱ्या मुलींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप खुद्द त्याच्या पत्नीने हसीनने केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हसीनने आपल्या फेसबुक अकाऊंटवर काही फोटोज आणि व्हॉट्सअॅपचे स्क्रीन शॉट्स शेअर केले आहेत. 

काय म्हणतात शमीचे कुटुंबीय

शमी किंवा त्याच्या कुटुंबातील कुणीही अद्याप कॅमेरा समोर आलेले नाहीत. अचानक लात्री मोहम्मद शमी आपल्या गावच्या घरी गेला आणि त्याने मीडियाशी संवाद साधला.

काय म्हणाला शमी

माझ्या लग्नाला 4 वर्ष झाले आहेत. या 4 वर्षात काही गोष्टी का नाही आठवल्या? कारण हा की कट आहे ज्यात माझं करिअर खराब करण्याचा हेतू आहे. मी माझं कुटुंब आणि पत्नीसोबत राहू इच्छितो. माहित नाही ती असं का करतेय?

Read More